शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला ‘जीएमसी’ची विस्कटलेली घडी बसविण्याचे आव्हान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 13:28 IST

नवनिर्वाचित पालकमंत्री बच्चू कडू जिल्ह्याचा आढावा घेणार असल्याची माहिती असून, आरोग्य विभागाची विस्कटलेली घडी बसविण्याचे त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे.

अकोला : वाढती रुग्णसंख्या अन् अपुरे मनुष्यबळ यामुळे सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णसेवा प्रभावित होत आहे. अशातच दलालांचाही बंदोबस्त होत नसल्याने रुग्णांची पिळवणूक मोठी डोकेदुखी ठरत आहे. येत्या १५ जानेवारी रोजी नवनिर्वाचित पालकमंत्री बच्चू कडू जिल्ह्याचा आढावा घेणार असल्याची माहिती असून, आरोग्य विभागाची विस्कटलेली घडी बसविण्याचे त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील रिक्त पदांचा प्रश्न गत अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. दुसरीकडे उपलब्ध मनुष्यबळाच्या तुलनेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होताना दिसून येतो. शिवाय, स्वच्छतेचीही समस्या गंभीर झाल्याने येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह डॉक्टरांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत रुग्णांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याचा फायदा दलाल मंडळी घेत आहेत; मात्र त्यांचा बंदोबस्त होत नसल्याने सर्वोपचार रुग्णालय परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयाची विस्कटलेली घडी बसविणे गरजेचे आहे. येत्या १५ जानेवारी रोजी नवनिर्वाचित पालकमंत्री बच्चू कडू जिल्ह्याचा आढावा घेणार असल्याची माहिती आहे. आरोग्य विभाग हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय असून, सर्वोपचार रुग्णालयाची विस्कटलेली घडी ते बसविणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.डॉक्टरांची खासगी प्रॅक्टिसशासकीय रुग्णालयात सेवा देत असतानाही काही डॉक्टरांकडून खासगी प्रॅक्टिस केली जाते. शिवाय, येथील रुग्णांना ‘रेफर टु’ खासगी रुग्णालयाचाही सल्ला दिला जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. असे असतानाही अशा डॉक्टरांना शासकीय वेतनासोबत इतर भत्त्यांचा लाभ मिळत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.पद निर्मितीअभावी रखडले सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन डिसेंबर २०१९ मध्येच करण्याबाबत जीएमसीला पत्र पाठविले होते; मात्र केंद्र सरकारकडून अद्यापही पद निर्मितीला मंजुरी दिली नाही. दुसरीकडे इमारतीचे काम जवळपास पूर्ण झाले असून, कोट्यवधींचे वैद्यकीय उपकरणेही दाखल झाली आहेत; मात्र तज्ज्ञ मनुष्यबळाअभावी या वैद्यकीय उपकरणांचे इन्स्टॉलेशन झालेले नाही.या आहेत महत्त्वाच्या समस्या

  • रुग्णालयात होणारी अन्नाची नासाडी.
  • रुग्णांसाठी मार्गदर्शक फलकेच नाहीत.
  • औषधांसाठी आर्थिक फटका.
  • कोट्यवधींच्या वैद्यकीय उपकरणांचे इन्स्टॉलेशन नाही.
  • जुनी इमारत धोकायक; स्ट्रक्चर आॅडिटचा अहवाल नाही.
  • दलालांना डॉक्टरांचेच सहकार्य.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय