शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘कर्मशियल’ वीज देयकांचे शाळांपुढे आव्हान

By admin | Updated: June 6, 2015 01:41 IST

थकीत देयकांपोटी शाळांमधील वीजपुरवठा होतोय बंद.

अकोला : व्यावसायिक (कर्मशियल) दराने जिल्हा परिषद शाळांना वीज देयके आकारण्यात येत असून, देखभाल व दुरुस्तीच्या खर्चासाठी उपलब्ध होणार्‍या अत्यल्प अनुदानातून वीज देयकांचा भरणा करणे शक्य नसल्याच्या स्थितीत थकीत देयकापोटी शाळांचा वीजपुरवठा बंद करण्यात येत आहे. त्यामुळे ह्यकर्मशियलह्ण दराच्या वीज देयकांचा भरणा करण्याचे आव्हान जिल्हाभरातील जिल्हा परिषद शाळांपुढे निर्माण झाले आहे. जिल्हा परिषद शाळांना दिलेल्या वीजपुरवठय़ाची ह्यकर्मशियलह्ण दराने आकारणी केली जाते. दरमहा शाळांना एक हजार ते १ हजार २00 रुपयांपर्यंत वीज देयकांचा भरणा करावा लागतो. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण ९२२ शाळा असून, या शाळांच्या देखभाल व दुरुस्तीचा खर्च भागविण्यासाठी वर्षाकाठी सात हजार रुपयांपर्यंतचे अनुदान जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत शाळांच्या मुख्याध्यापकांना वितरित केले जाते. या अनुदानातून जिल्हा परिषद शाळांना वीज देयकांचा भरणादेखील करावा लागतो; परंतु उपलब्ध अत्यल्प अनुदानाच्या निधीतून दरमहा सरासरी एक हजार रुपयांप्रमाणे वीज देयकाची रक्कम अदा करणे जिल्हा परिषद शाळांना शक्य होत नाही. थकीत वीज देयकापोटी जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत अंतर्गत २५ ते ३0 शाळांचा वीजपुरवठा बंद केला जातो.