शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चाकतिर्थ प्रकल्प पडला कोरडा

By admin | Updated: March 21, 2017 14:12 IST

मालेगाव: उन्हाळ्याला सध्याच सुरुवात झाली असताना मालेगाव तालुक्यातील चाकतिर्थ हा जलप्रकल्प कोरडा पडला आहे.

पाणीटंचाईची समस्या: क्षमतेपेक्षा अधिक उपसा केल्याचा परिणाम मालेगाव: उन्हाळ्याला सध्याच सुरुवात झाली असताना मालेगाव तालुक्यातील चाकतिर्थ हा जलप्रकल्प कोरडा पडला आहे. सिंचनासाठी वारेमाप उपसा केल्यामुळे या प्रकल्पातील जलसाठा संपल्याचे दिसत आहे.मालेगाव तालुक्यात जऊळका रेल्वे यागावानजिक काटेपूर्णा नदीवर चाकतिर्थ प्रकल्प उभारण्यात आला आहे. जवळपास आठ ते दहा वर्षांपूर्वी या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले. प्रकल्पाची साठवण क्षमता मोठी असून, या प्रकल्प परिसरातील नाल्यांच्या संख्येमुळे हा प्रकल्प नेहमी काठोकाठ भरतो. यंदाही हा प्रकल्प पूर्णपणे भरला होता. त्यामुळे या उन्हाळ्यात परीसरातील गावांत पाणीटंचाई जाणवणार नसल्याचा विश्वास वाटत होता; परंतु हा प्रकल्प अद्याप उन्हाळ्याला सुरुवातही झाली नसतानाच कोरडा पडला आहे. या प्रकल्पातून जऊळका रेल्वे येथील तीन गावे पाणी पुरवठा योजना राबविण्यात येते. मालेगाव तालुक्यातील महत्त्वाच्या प्रकल्पात समाविष्ट असलेला हा प्रकल्प आटल्यामुळे या पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न गंभीर झाला आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासह त्यापूर्वी आवश्यकता वाटली तेव्हा खरीपातही या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केला. त्यामुळे वेळेपूर्वीच हा प्रकल्प आटला आहे. सिंचनासाठी उपयुक्त असलेल्या या प्रकल्पातून शेकडो हेक्टर शेतीवर सिंचन होते; परंतु आता या प्रकल्पात पाणीच नसल्याने शेती सिंचनच काय, तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभी झालेला आहे.या प्रकल्पात पाण्याचे स्त्रोत मोठ्या प्रमाणात असले तरी, पाण्याचा वापर लक्षात घेता या प्रकल्पाच्या भिंतींची उंची वाढविणे आवश्यक झाले आहे.