शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्ष पदाच्या निवडीवरून काँग्रेसमध्ये घमासान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 01:51 IST

अकोला: काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तसेच महानगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी अकोल्यात दाखल झालेले पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकारी आमदार राजेश कुमार यांच्यावर पहिल्याच दिवशी स्थानिक पदाधिकार्‍यांमधील सवतासुभा पाहण्याची वेळ आली. महानगराध्यक्ष पदासाठी निवडणूक झालीच पाहिजे, या मुद्यावरून काँग्रेसच्या बैठकीत प्रचंड घमासान रंगल्याचे चित्र समोर आले. शहरात काँग्रेस पक्षाचे अपरिमित नुकसान होत असल्याचा आरोप करीत पक्ष संघटनेसाठी सक्षम दावेदाराची निवड करण्याचा आग्रह पदाधिकार्‍यांनी लावून धरला. 

ठळक मुद्देपक्षाच्या बैठकीत पदाधिकारी आक्रमकनिवडणुकीसाठी पदाधिकारी आग्रही

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तसेच महानगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी अकोल्यात दाखल झालेले पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकारी आमदार राजेश कुमार यांच्यावर पहिल्याच दिवशी स्थानिक पदाधिकार्‍यांमधील सवतासुभा पाहण्याची वेळ आली. महानगराध्यक्ष पदासाठी निवडणूक झालीच पाहिजे, या मुद्यावरून काँग्रेसच्या बैठकीत प्रचंड घमासान रंगल्याचे चित्र समोर आले. शहरात काँग्रेस पक्षाचे अपरिमित नुकसान होत असल्याचा आरोप करीत पक्ष संघटनेसाठी सक्षम दावेदाराची निवड करण्याचा आग्रह पदाधिकार्‍यांनी लावून धरला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तसेच महानगराध्यक्षांची निवड प्रदेश स्तरावर न करता सदस्य नोंदणी करून लोकशाही पद्धतीने मतदानाच्या माध्यमातून निवड करण्यासाठी राहुल गांधी आग्रही आहेत. त्यांच्या निर्देशानुसारच पक्षांतर्गत निवडणुकीसाठी काँग्रेसने सदस्य नोंदणी मोहीम पूर्ण केली. मतदानासाठी १ हजार ८४१ सदस्य पात्र ठरले आहेत. ऑगस्ट महिन्यात निवडणूक प्रक्रियेद्वारे पक्षातील विविध पदांसाठी पदाधिकार्‍यांची निवड करणे अपेक्षित होते. अखेर उशिरा का होईना, जिल्हाध्यक्ष तसेच महानगराध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा आमदार राजेश कुमार मंगळवारी अकोल्यात दाखल झाले. स्वराज्य भवनमध्ये आयोजित बैठकीत निवड प्रक्रियेसंदर्भात स्थानिक पदाधिकार्‍यांनी मते व्यक्त केली. यावेळी काँग्रेसमधून पदाधिकार्‍यांची निवड करण्यासाठी सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आल्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत महानगराध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याची मागणी पदाधिकार्‍यांनी लावून धरली. मागील दोन वर्षांच्या कालावधीत पक्षाचे वाटोळे झाल्याचा आरोप करीत विद्यमान महानगराध्यक्ष बबनराव चौधरी यांना कडाडून विरोध असल्याचे पदाधिकार्‍यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले. बैठकीला माजी राज्यमंत्री अजहर हुसेन, माजी आ. नातिकोद्दीन खतीब, प्रदेश महासचिव मदन भरगड, महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष सुषमा निचळ, स्वाती देशमुख, प्रकाश तायडे, राजेश भारती, हेमंत देशमुख, मनपा विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण, राजेश पाटील, नगरसेविका शाहीन अंजुम खान, नगरसेवक डॉ. जिशान हुसेन, कपिल रावदेव, राजेश राऊत, विष्णू मेहरे, अनंतराव बगाडे, महेंद्रसिंग सलुजा, नितीन ताकवाले, महेश गणगणे, रवी शिंदे, विलास गोतमारे, अंशुमन देशमुख, चंद्रकांत सावजी, अजहर इक्बाल, सागर कावरे, आकाश कवडे, मनपा उर्दू शिक्षक संघटनेचे अध्यक्ष खान सरदार खान आदी पदाधिकार्‍यांसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.