अकोला : केंद्रीय होमिओपॅथी परिषदेची ३१ डिसेंबर रोजी निवडणूक होत असून, राज्यातील ५ जागांसाठी २९ उमेदवार रिंगणात आहेत. ३ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहेत.केंद्रीय होमिओपॅथी परिषदेची निवडणूक दर पाच वर्षांतून घेण्यात येते. संपूर्ण देशातील तब्बल १ लाख ९५ हजार होमिओपॅथी डॉक्टर या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतात. यामध्ये महाराष्ट्रात ५ जागा असून, महाराष्ट्र राज्य होमिओपॅथी डॉक्टर्स कृती समिती, महाराष्ट्र होमिओपॅथी डॉक्टर्स अन्याय निवारण समिती, पुणे येथील निहार संघटना व अपक्ष, असे एकूण २0 उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांना राज्यातील ३८ हजार पुननरेंदणीकृत होमिओपॅथी डॉक्टर्स मतदान करणार असून, ३ फेब्रुवारी रोजी या निवडणुकांचे मुंबई येथे निकाल जाहीर होणार आहेत.
केंद्रीय होमिओपॅथी परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी!
By admin | Updated: December 22, 2014 23:26 IST