मूर्तिजापूर : नगर परिषद, मूर्तिजापूर व दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानतर्फे पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी अंतर्गत ‘मै भी डिजिटल मोहीम’ सुरू केली असून, आर्थिक साक्षरता प्रशिक्षण १२ जानेवारी राेजी मुख्याधिकारी विजय लोहकरे यांच्या मार्गदर्शनात पार पडले. शहरातील पथविक्रेत्यांना योजनेंतर्गत दहा हजार रुपये प्रति लाभार्थीप्रमाणे कर्ज राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत उपलब्ध करून देण्यात आले. व्यवसाय करताना आर्थिक व्यवहार करण्यासाठी डिजिटल साधनांपासून मिळणारे फायदे, डिजिटल साधने कशी वापरावी, याचे प्रशिक्षण लाभार्थींना देण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष मोनाली गावंडे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया मूर्तिजापूरचे ॲग्रीकल्चर ऑफिसर निशिकांत चव्हाण, सहा प्रकल्प अधिकारी राजेश भुगुल यांच्या हस्ते क्यूआर कोडचे वाटप करण्यात आले. यावेळी सेंट्रल बँकेकडून ४५ लाभार्थींना डिजिटल पेमेंट करण्याबाबत व क्यूआर कोड वापरण्याबाबत प्रशिक्षण यावेळी देण्यात आले. अशा प्रकारचे प्रशिक्षण २४ जानेवारीपर्यंत विविध बँकेमार्फत आयोजित केल्याची माहिती सहा. प्रकल्प अधिकारी राजेश भुगुल यांनी दिली.
केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान आत्मनिर्भर निधी अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:16 IST