शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आंध्रातील कंपन्यांच्या अडवणूक धोरणामुळे वाढताहेत सिमेंटचे भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 12:24 IST

राज्यातील असलेली मोठी मागणी लक्षात घेत आंध्र प्रदेशातील डेकन, सागर, महागोल्ड, महाशक्ती आदी कंपन्यांनी राज्यातील पुरवठा गत दहा दिवसांपासून थांबविला.

- संजय खांडेकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: रॉयल्टी आणि वाहतुकीच्या अतिरिक्त खर्चावर बोट ठेवून आंध्र प्रदेशातील सिमेंट कंपन्यांनी अडवणुकीचे धोरण अवलंबल्याने महाराष्ट्रातील सिमेंटच्या दरात भाववाढ होत आहे. ६ आणि ७ जानेवारी रोजी मुंबईत होणाऱ्या क्रेडाईच्या राज्यस्तरीय अधिवेशनापूर्वी सिमेंट कंपन्यांतर्फे प्रत्येक गोणीमागे ३० ते ३१ रुपये भाववाढ करण्याची अधिकृत घोषणा केली जाण्याचे संकेत आहेत.राज्यात चंद्रपूर आणि आंध्र प्रदेशातून सिमेंटचा पुरवठा होत असतो. गत आठ दिवसांपासून राज्यात सिमेंटचा तुटवडा भासत आहे. सर्वात स्वस्त सिमेंट आंध्र प्रदेशातील असल्याने राज्यात सर्वात जास्त प्रमाणात त्याचा वापर होतो. शासकीय इमारतींच्या बांधकामातही आंध्राचेच सिमेंट वापरले जाते. राज्यातील असलेली मोठी मागणी लक्षात घेत आंध्र प्रदेशातील डेकन, सागर, महागोल्ड, महाशक्ती आदी कंपन्यांनी राज्यातील पुरवठा गत दहा दिवसांपासून थांबविला. त्यामुळे पर्यायाने लोकांना महागडे सिमेंट घ्यावे लागत आहे. अचानक झालेल्या सिमेंटच्या भाववाढीमुळे बांधकाम व्यावसायिक हादरले आहेत; मात्र ही भाववाढ कशामुळे होत आहे, याबाबत मात्र ठोस कारण अद्यापही पुढे आले नाही.रॉयल्टी आणि वाहतुकीवर अतिरिक्त खर्च होत असल्याची सबब तेवढी सिमेंट कंपन्यांच्या प्रमुखांनी पुढे केली आहे. जर सिमेंट कंपन्यांनी प्रतिगोणीमागे ३० रुपयांची भाववाढ केली, तर आंध्र प्रदेशातील अलीकडचे स्वस्त सिमेंटदेखील तीनशे रुपयांच्या घरात जाणार आहे. बांधकाम व्यावसायिकांवर आधीच मंदीचे सावट आहे. त्यात लोखंड आणि सिमेंटचे भाव वाढल्याने बांधकाम व्यावसायिक आणि या उद्योगाशी संबंधित साखळी उद्योगावर अवकळा आली आहे.बाजारपेठेत मागणी नसताना आणि कोणतेही ठोस कारण नसताना सिमेंटच्या किमतीत भाववाढ होत आहे. कोणतीही अतिरिक्त मागणी नसताना राज्यात सिमेंटचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून नव्याने सत्तारूढ झालेल्या राज्य सरकारला अडचणीत आणण्याचा हा डाव आहे. मंदीमुळे राज्यातील बांधकाम व्यावसायिकांवर आधीच संक्रांत आलेली आहे. त्यात सिमेंटमध्ये भाववाढ करून बेरोजगारी तयार केली जात आहे.-दिनेश ढगे,क्रेडाई, जिल्हाध्यक्ष, अकोला.

टॅग्स :Akolaअकोलाbusinessव्यवसाय