शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आज लोकमत सखी मंचतर्फे ‘सेलिब्रिटी धमाका’

By admin | Updated: February 6, 2016 01:04 IST

लोकमत सखी मंच आणि आयएमए असोसिएशन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने खास लोकमत सखी मंच सभासदांसाठी ‘सेलिब्रिटी धमाका’ आयोजित करण्यात आला आहे.

बुलडाणा : सहकार क्षेत्रात सोशल बँकिंगचा प्रयोग करीत बुलडाणा अर्बनने आशिया खंडात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. पारदर्शक व्यवहार व लोकाभिमुख कार्यप्रणाली यामुळे बुलडाणा अर्बनची भूरळ अनेक देशांना पडली असून, नेपाळमध्ये कार्यरत असलेल्या सर्वात मोठय़ा १५ पतसंस्थांचे अध्यक्ष, संचालक व अधिकार्‍यांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने बुलडाणा अर्बनच्या कार्यप्रणालीचा तीन दिवस अभ्यास केला. अभ्यास दौर्‍यातील सदस्यांनी बुलडाणा अर्बनचे सोशल बँकिंग मॉडेल सहकार क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे स्पष्ट करीत हाच पॅटर्न नेपाळमध्ये राबविण्यार असल्याचा निर्धार व्यक्त केला.नेपाळच्या सहकार व बँकिंग क्षेत्रात काम करणार्‍या या अभ्यासगटाचे नेतृत्व इंदिरा पंत यांनी केले. त्यांच्या समवेत मनोज भंडारी, केदार मनांधर, प्रकाशकुमार बर्मा, सीताराम काफले, माधवप्रसाद पौडल, रामचंद्र उपरेती, साबिना शाकिया, बिरेंद्रकुमार बालामी, सुरेंद्रराज खत्री छेत्री, विजयकुमार महाजन, निर्जला ङ्म्रेष्ठा, केशवप्रसाद पोखरेल, गणेश बहादूर, राजकुमार खडका आदी पदाधिकारी, अधिकार्‍यांचा समावेश होता. या सदस्यांना बुलडाणा अर्बनचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक तथा इंटरनॅशनल को-ऑप. एलायन्स एशिया पॅसिपिक युथ कमिटीचे पहिले भारतीय चेअरमन डॉ.सुकेश झंवर यांनी संस्थेच्या वतीने राबविण्यात आलेल्या नावीण्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. कापसापासून थेट कापड तयार करणार्‍या डोंगरखंडाळा येथील देशातील पहिल्या बुलडाणा अर्बन टेक्सस्टाइल मिल प्रकल्प, दाल मिल, वॉटर एटीएम, सहकार विद्या मंदिर, शेततलाव, चिखली येथील कोल्ड स्टोरेज, संस्थेचा क्लिनिंग ग्रेडिंग युनिट आदी सर्व प्रकल्पांना शिष्टमंडळाने भेट दिली. मोताळा येथील सहकार विद्या मंदिर, तेथील संस्थेचे शाखा कार्यालय, मलकापूरचा वॉटर बॉटलिंग प्लँट, बुलडाणा येथील संस्थेच्या मुख्यालयातील विविध विभागांना तसेच संस्थेच्या बायोगॅस, ऊर्जा बचत प्रकल्प, ब्लड बँक, कंझ्युमर स्टोअर्स, छात्रा निकेतन, शिर्डी येथील इंटरनॅशनल ट्रेनिंग सेंटरला भेट देऊन त्यांनी पाहणी केली. नेपाळी सदस्यांना कार्यप्रणालीची भुरळनेपाळच्या अभ्यास गटाने बुलडाणा अर्बनची व्यवस्थापन कार्यप्रणाली व अत्याधुनिक बँकिंग, डाटा सेंटर, भारतात बनविण्यात आलेल्या एटीएम मशीन, कॅश डिपॉझिट मशीन, गोदाम संकल्पना, बँकिंग कार्यप्रणालीचा सखोल अभ्यास केला. संस्थेच्या सोशल बँकिंग अंतर्गत संस्थेच्या शाळांमध्ये राबविण्यात येत असलेले शैक्षणिक उपक्रम यामध्ये संस्थेने तयार केलेल्या रोबोटिक्स, विविध एज्युकेशनल सॉफ्टवेअर याबाबत माहिती घेतली.       डॉ. सुकेश झंवर यांनी राबविलेल्या नावीण्यपूर्ण उपक्रमांतर्गत पवनचक्की, सायकल पंप, सायकल नांगर, कल्टीवेटर व स्थानिक पातळीवर बचत गटाच्या माध्यमातून परफ्यूम, साबण, श्ॉम्पू तयार करणार्‍या मशनरीचा नेपाळच्या सदस्यांनी अभ्यास करून माहिती जाणून घेतली.