लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: गेल्या शनिवारपासून सुरू असलेल्या तीन दिवसीय दि युनिक अॅकॅडमी प्रस्तुत ‘लोकमत अस्पायर एज्युकेशन फेअर’चा सोमवार १२ जून रोजी जल्लोषात समारोप करण्यात आला. दि. होरायझन इन्स्टिट्युट अकोलासह प्रायोजक असणाऱ्या व स्थानिक मेहेरबानू महाविद्यालयात सुरू असलेल्या या शैक्षणिक प्रदर्शनाला तीन दिवस हजारो विद्यार्थी आणि पालकांनी भेट देत लोकमतच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच स्थानिक शैक्षणिक संस्थांचा सहभाग असणाऱ्या या शैक्षणिक प्रदर्शनात विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटा शोधण्यासाठी योग्य दिशा मिळण्याच्या अनुषंगाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दररोज विविध तज्ज्ञ मंडळींमार्फत उपयुक्त असे मार्गदर्शन सेमिनारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात आले. पालकांनी या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल लोकमतचे आभार व्यक्त केले. संपूर्ण महाराष्ट्रभर एकूण १५ ठिकाणी गेल्या पाच वर्षांपासून आयोजित लोकमत अस्पायर एज्युकेशन फेअरचे सर्व पालक व विद्यार्थ्यांच्या साक्षीने शानदार आयोजन करण्यात आले. याबद्दल सर्वांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले. योग्य करिअरचा निर्णय घ्यायचा तर स्वत:ला ओळखा - सचिन बुरघाटेजीवनातील भावी वाटचाल यशस्वी करायची असेल, तर स्वत:ला जे आवडते तेच निवडून त्यात करिअर केल्यास कामाचे ओझे न वाटता ते करण्याचा वेगळाच आनंद जीवनात मिळवता येतो, असे प्रतिपादन जागतिक कीर्तीचे वक्ते प्रा. सचिन बुरघाटे यांनी लोकमत अस्पायर एज्युकेशन फेयरच्या आपल्या ‘द डिसिजन’ या व्याख्यानात केले. लोकमततर्फे गेल्या तीन दिवस सुरू असलेल्या शैक्षणिक प्रदर्शनात त्यांच्या समारोपीय व्याख्यानात ते बोलत होते. ते म्हणाले, कुठलेही करिअर निवडताना इतरांचे ऐकण्याऐवजी प्रत्येकाने स्वत:ला ओळखून निर्णय घेणे आवश्यक आहे. कुठलीही करिअरच्या दृष्टीने आवश्यक चांगली गोष्ट करण्यासाठी जो स्वत:हून पुढाकार घेतो त्यालाच यशस्वी जीवनाचा योग्य मार्ग निवडण्यास मदत होते. विद्यार्थ्यांना करिअरचे निर्णय घेण्यासाठी लोकमत अस्पायर एज्युकेशन फेयरसारखे स्तुत्य व्यासपीठ आज उपलब्ध असून, लोकमतच्या उपक्रमाचे कौतुक त्यांनी केले. लोकमत समूहाने विद्यार्थ्यांकरिता लोकमत अस्पायर एज्युकेशन फेअरच्या माध्यमातून सर्व माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला द युनिक अॅकॅडमीच्या माध्यमातून महाराष्ट्र व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा टक्का वाढावा या अनुषंगाने आपल्याकडील ज्ञानातून सक्षमीकरणाचे ब्रीद स्वीकारून कार्य करण्याचे काम आम्ही करीत आहोत.- सुनील देशमुख,समन्वयक, द युनिक अॅकॅडमी, जळगाव शाखाएमपीएससी, यूपीएससीत यशाकरिता प्रयत्नात सातत्य आवश्यक - सुधाकर राठोड आयएएस, आयपीएस, डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपीचे ध्येय बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांनी योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळवून प्रयत्न केल्यास नक्कीच यश प्राप्त होते, असे प्रतिपादन अग्रारियन अॅकॅडमीतर्फे आयोजित व्याख्यानात अग्रारियन संचालक प्रा. सुधाकर राठोड यांनी आपल्या भाषणात केले. इयत्ता पाचवीपासूनच या सेवांमध्ये रुजू होण्याकरिता विद्यार्थी ध्येय ठरवून तयारी करू शकतात. या सेवांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
लोकमत अस्पायर एज्युकेशन फेअरचा जल्लोषात समारोप
By admin | Updated: June 13, 2017 00:53 IST