शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रद्दी विकून केली उपेक्षित, वंचितांची दिवाळी साजरी; स्वराज फाउंडेशनचा उपक्रम

By atul.jaiswal | Updated: November 14, 2023 12:15 IST

गरजूंना कपडे, फराळाचे वाटप

अतुल जयस्वाल, अकोला : ‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले’ या अभंगाला अनुसरून अकोल्यातील एक अवलिया गत १८ वर्षांपासून गोरगरीब, वंचित, उपेक्षित जणांची दिवाळी साजरी करीत आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही संकलित झालेल्या रद्दीच्या विक्रीतून मिळालेले पैसे व काही दात्यांच्या सहकार्याने स्वराज फाउंडेशनचे पुरुषोत्तम शिंदे यांनी गरजूंना नवे कपडे व फराळाचे वाटप करून त्यांची दिवाळी गोड केली. पुरुषोत्तम शिंदे यांनी वंचितांची दिवाळी साजरी करण्याचा ध्यास घेतला असून, गत १८ वर्षांपासून ते हा उपक्रम राबवीत आहेत.

दरवर्षीप्रमाणे आपल्या सहकाऱ्यांसोबत दिवाळीच्या आदल्या दिवशी गोरगरिबांना कपडे व फराळ वाटपाचा उपक्रम सुरू करण्यात आला. या अंतर्गत जठारपेठ भागातील गजानन महाराज मंदिर परिसर, मोठी उमरी स्मशानभूमीमागचा परिसर, सातव चौक, जिल्हा स्त्री-रुग्णालय, सर्वोपचार रुग्णालय परिसर, अनिकट, गरजूंना कपडे व फराळाचे वितरण करण्यात आले. लक्ष्मीपूजन व भाऊबीजेच्या दिवशीही शहरातील विविध ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात आला. पुरुषोत्तम शिंदे यांना या कामात संदीप दाभाडे, शंतनू शिंदे, अक्षय खाडे, सचिन व स्वप्निल यांचे सहकार्य लाभले.

साडी, लुगडं व लहान मुलांचे कपडे

स्वराज फाउंडेशनने रद्दी विकून मिळालेल्या पैशांतून साडी, लुगडे, धोतर व लहान मुलांचे कपडे खरेदी केले. सलग तीन दिवस शहरातील विविध भागांत जाऊन गोरगरीब व गरजूंना या कपड्यांचे वितरण करण्यात आले. तसेच जवळपास ७० किलो फराळाचे वितरणही करण्यात आले. या माध्यमातून तब्बल ५५० उपेक्षितांची दिवाळी गोड झाली.

५००० किलो रद्दी संकलित

स्वराज फाउंडेशनच्या हाकेस ओ देऊन अकोलेकरांनी सात रद्दी संकलन केंद्रांवर रद्दी जमा केली. दिवाळीपर्यंत तब्बल ५००० किलो रद्दी संकलित झाली. ही रद्दी विकून मिळालेले पैसे, काही सेवाभावी संस्था आणि व्यक्तींच्या सहकार्याने दिवाळीचा फराळ व कपडे खरेदी करून ते गरजूंना वितरित करण्यात आले.

टॅग्स :Diwaliदिवाळी 2023