शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला रेल्वेस्थानकावर लागणार ‘सीसी कॅमेरे’

By admin | Updated: May 27, 2017 00:48 IST

एक वर्षात होईल काम पूर्ण : भुसावळ डीआरएम आर.के. यादव यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: प्रवाशांची सुरक्षा आणि स्वच्छता कायम राहण्यासाठी मॉडेल ठरलेल्या अकोला रेल्वेस्थानकावर सीसी कॅमेरे लागणार असून, या कामाला गती दिल्या जात असून, कोणत्याही परिस्थितीत वर्षभरात हे काम पूर्ण होईल, अशी माहिती भुसावळचे डीआरएम आर. के. यादव यांनी दिली. दीड महिन्यापूर्वी गुप्ता यांच्या जागी बदलून आलेले यादव यांनी शुक्रवारी दुपारी प्रथमच अकोला रेल्वेस्थानकास भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली. त्यामुळे जवळपास सर्वच अधिकारी त्यांच्यासाठी नवीन होते.डीआरएम यादव शुक्रवारी अकोला भेटीवर येत असल्याची माहिती येताच अकोला रेल्वे स्टेशन मास्टर जी.बी. मीणा, आरपीएफ, जीआरपी आणि सफाई कर्मचाऱ्यांची एकच धावपळ झाली. डीआरएम यादवसह अधिकाऱ्यांचा मोठा ताफा प्रामुख्याने उपस्थित होता. रेल्वेस्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक एकवर या पथकाने सर्व्हे केला. गाडीची स्थिती दर्शविणाऱ्या टचस्क्रीन संगणकाचा ताबा घेत त्यांनी परिस्थिती निहाळली. येथे सूचना देत तेथून ते जीआरपी पोलीस ठाण्याच्या जवळ असलेल्या पे अ‍ॅन्ड पार्किंगकडे वळले. पार्किंगला शिस्त लावण्याचे निर्देश त्यांनी येथे दिले. फोर व्हीलरच्या पार्किंगचा आढावाही त्यांनी घेतला. दरम्यान, येथील वाहतूक पोलीस शिपायाशी संवाद साधून त्यांनी उपाययोजना करण्याचे सांगितले. त्यानंतर रेल्वेस्थानकाच्या तिकीटघराशेजारी असलेल्या महिला आणि पुरुषांच्या शौचालयाची पाहणी केली. सोबतच पाण्याची व्यवस्था पाहिली. त्यानंतर त्यांचा मोर्चा पुन्हा प्लॅटफार्म क्रमांक एककडे वळला. प्रतीक्षालयाची आणि अधिकाऱ्यांच्या विश्रामालयाची पाहणीही त्यांनी केली. डीआरएम शुक्रवारी अकोल्यात येत असल्याने शुक्रवारी सकाळपासून तर ते असेपर्यंत स्थानकाच्या प्लॅटफार्मवर आणि परिसरात स्वच्छता अभियान राबविले गेले. स्थानक परिसरात आणि रेल्वे रुळावर डीडीटी पावडरची फवारणी करण्यात आली. कधी नव्हे ते एका शिस्तीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची फळी येथे प्रामुख्याने उपस्थित होती. शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजतापासून तर दीड वाजेपर्यंत यादव यांनी अकोल्याचा आढावा घेतला. त्यानंतर ते बडनेरा रेल्वेस्थानकाकडे रवाना झाले.मोटारसायकल पार्किंगला शिस्तीची गरजरेल्वेस्थानकावरील मोटारसायकल पार्किंगला शिस्तीची गरज असल्याचे मत याप्रसंगी यादव यांनी व्यक्त केले. यासाठी त्यांनी स्थानकाबाहेरील पे अ‍ॅन्ड पार्किंग सायकल स्टँडला भेट दिली. सोबत रेल्वेस्थानकाच्या दोन्ही प्रवेशद्वाराजवळील मार्ग मोकळा करण्याचे निर्देश आरपीएफ पोलिसांना दिले.