शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कवठा धरणाला पडले भगदाड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 02:33 IST

अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील कवठा शेलू येथील धरणाच्या बांधकामात निकृष्ट मुरू म, साहित्य वापरल्यामुळे या धरणांच्या भिंतींना भगदाड पडले आहे. जवळपास दोन ते आठ कोटी रुपये खर्च झालेले हे निकृष्ट काम पुन्हा करण्यासाठीचा प्रस्ताव लघू पाटबंधारे विभागाने तयार केल्याचे वृत्त आहे. असे केले तर अगोदर झालेला या धरणाच्या बांधकामावरील खर्च कोण देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देनव्याने काम करणारअगोदरच्या खर्चाचे काय!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील कवठा शेलू येथील धरणाच्या बांधकामात निकृष्ट मुरू म, साहित्य वापरल्यामुळे या धरणांच्या भिंतींना भगदाड पडले आहे. जवळपास दोन ते आठ कोटी रुपये खर्च झालेले हे निकृष्ट काम पुन्हा करण्यासाठीचा प्रस्ताव लघू पाटबंधारे विभागाने तयार केल्याचे वृत्त आहे. असे केले तर अगोदर झालेला या धरणाच्या बांधकामावरील खर्च कोण देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.मूर्तिजापूर तालुक्यातील कवठा शेलू येथे ११ कोटी रुपये खचरून हे धरण बांधण्यात येत आहे. २७४ हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या या धरणाचे काम २00९ मध्ये सुरू  करण्यात आले होते. धरणाचे भूमिगत ड्रेन व रॉपटेज म्हणजेच दगडाचे बांधकाम झाले आहे. दोन वर्षांपासून धरणाचे काम बंद पडले आहे. अगोदर धरणाच्या बांधकामावर आठ कोटींवर खर्च झाल्याचे वृत्त आहे.दरम्यान, संबंधित विभागाने धरणाचे नव्याने बांधकाम करण्यासाठी नाशिक येथील मध्यवर्ती संकल्प चित्र संघटनेकडे डिझाइनसाठी प्रस्ताव पाठविणार असल्याचे वृत्त आहे. या भागातील शेतकर्‍यांना सिंचनासाठी पाणी मिळावे म्हणून जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले आहे; पण मागील आठ वर्षांपासून या धरणाच्या कामाला विलंब होत आहे. सुरुवातीला मूर्तिजापूर तालुक्यातील ८४ गावे कारंजा मतदारसंघात होती, त्यावेळी या धरणाचे काम वाशिम जिल्हय़ांतर्गत करण्यात आले. नंतर ही गावे मूर्तिजापूर मतदारसंघात समाविष्ट करण्यात आली आहेत. आता या धरणाचे काम अकोला विभागाकडे आले आहे. या धरणाचे काम तातडीने व्हावे, यासाठी या भागातील लोकप्रतिनिधीचा रेटा वाढला आहे. 

कवठा शेलू धरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. धरणाच्या बांधकामासाठी निकृष्ट साहित्य वापरल्याने भेगा पडल्या आहेत. यासंदर्भात आपण पाठपुरावा केला आहे. विधानसभेत लक्षवेधी केली आहे. या भागात धरण होऊन शेतकर्‍यांना सिंचनासाठी पाणी मिळावे, यासाठीचे प्रयत्न आहे. त्यासाठी नव्याने प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.- हरीश पिंपळे, आमदार, मूर्तिजापूर.