शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

पॅकेजतंर्गत गायी वाटप घोटाळा !

By admin | Updated: April 25, 2015 02:15 IST

संस्थाचे पुन्हा फेरलेखा परिक्षण ; लोकमत इफेक्ट.

अकोला: विदर्भातील शेतकर्‍यांना आत्महत्येच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी विशेष पॅकेजांतर्गत वाटप करण्यात आलेल्या गायी वाटपात प्रचंड घोळ झाला असून, अकोला जिल्हय़ातील या घोळाची चौकशी गत सात वर्षांपासून गुलदस्त्यात होती,लोकमतने याप्रकरणी वृत्त प्रसिध्द करताच, या विषयावर मागील महिन्यात विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे गायी लाभधारक संस्थाचे पुन्हा फेर लेखा परिक्षण करण्याचे आदेश पशूसंवर्धन दुग्धविकास व मत्स्य मंत्रालयाने दिले असून, गुरू वारपासून जिल्हयातील लाभधारक संस्थाचे फेर लेखा परक्षिण सुरू करण्यात आले आहे. शेतकर्‍यांना आत्महत्येच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी तत्कालीन केंद्रशासनाने पंतप्रधान व राज्य शासनाने विशेष मुख्यमंत्री पॅकेज दिले होते. केंद्र आणि राज्य मिळून जवळपास पावणे पाच हजार कोटींचे हे पॅकेज देण्यात आले होते. अल्पभूधारक शेतकर्‍यांना कर्जमुक्त करण्यात आले होते. या पॅकेजांतर्गत शेती विकासाच्या योजनांसह शेतकर्‍यांना जोडधंद्यांसाठी विविध योजना राबविण्यात आल्या. विदर्भ विकास पॅकेजांतर्गत विदर्भातील ११ जिल्हय़ात प्रत्येकी एक हजार गायींचे वाटप पन्नास टक्के अनुदानावर करण्यात आले होते. पण, अनेक ठिकाणी या गायी कागदोपत्रीच वाटप करू न शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. अकोला जिल्हय़ात हे वास्तव समोर आले आहे. या जिल्हय़ातील प्राथमिक दूध उत्पादक संस्थांच्या सभासदांना एक हजार गायींचे वाटप करण्यात आले आहे; परंतु यातील अनेक संस्थांना कागदोपत्री गायी खरेदी केल्याचे भासवून या पॅकेजच्या अनुदानाची रक्कम अपहार केल्याच्या तक्रारी झाल्या आहेत. या संदर्भात तत्कालीन जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी व साहाय्यक निबंधक सहकारी संस्था (पदूम) अकोला यांनी संयुक्तरीत्या चौकशी करू न अहवाल दिला आहे. या अहवालात या जिल्हय़ात मूर्तिजापूर तालुक्यात सहा संस्थांच्या माध्यमातून ४१ गायी खरेदी केल्याच नसल्याचे चौकशीअंती आढळून आले असल्याचे म्हटले आहे. तसेच बाश्रीटाकळी तालुक्यातील तीन सहकारी संस्थांच्या माध्यमातून २६ गायी खरेदी केल्या नसल्याचे निष्पन्न झाले आहे. तेल्हारा तालुक्यातील एका संस्थेने नऊ गायी खरेदी केल्या नसल्याचे म्हटले आहे. आकोट तालुक्यातील एका संस्थेच्या पाच गायीही खरेदी केल्या नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.