शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

जात, धर्माच्या नावावर हल्ले थांबवा!

By admin | Updated: July 8, 2017 02:18 IST

नागरिकांनी दिले ‘मूक धरणे’ : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जात आणि धार्मिक उन्मादातून करण्यात येणारे हल्ले आणि हत्यांचा निषेध करीत जात, धर्म व पंथाच्या नावार होणारे हल्ले तातडीने थांबविण्यात यावे, या मागणीसाठी अकोल्यातील नागरिकांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘मूक धरणे’ दिले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.देशात जात, धर्म उन्मादातून दररोज होणारे हल्ले आणि हत्याकांडात निरपराध नागरिकांच्या हत्या, जाळपोळ व मारहाणीच्याविरोधात ‘माझ्या नावावर अत्याचार नको’ (नॉट इन माय नेम) मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत देशात जात, धर्म, पंथाच्या नावावर कोणत्याही व्यक्ती व समूहावर हल्ले करणे व जीव घेणे थांबले पाहिजे, केंद्र सरकारने याबाबत दखल घेऊन विघातक प्रवृत्तीविरुद्ध कठोर कारवाई करावी, विशिष्ट धर्म किंवा विचारधारेचा प्रसार-प्रचार थांबविण्यात यावा, सामाजिक सलोखा बंधुभाव कायम राहावा, प्रत्येक नागरिकाने देशाच्या संविधानाप्रमाणे वर्तन करावे, यासाठी सरकारने पावले उचलून आतापर्यंत झालेले हल्ले व हत्या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी, दोषींविरुद्ध जलदगती न्यायालयात खटले चालवून त्यांना शिक्षा देण्यात यावी इत्यादी मागण्यांसाठी अकोल्यातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘मूक धरणे’ आंदोलन केले. मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींकडे सादर करण्यात आले. या धरणे आंदोलनात माजी राज्यमंत्री अजहर, गुलाबराव गावंडे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, उपाध्यक्ष जमीरउल्लाखा पठाण, डॉ. पुरुषोत्तम तायडे, सत्यपाल महाराज, राजेंद्र पातोडे, काझी नाझीमोद्दीन, मुफ्ती अशफाक कासमी, भन्ते श्रीलाभ, डॉ. सुभाष तिवारी, मजहर खान, पंकज जायले, भन्ते पूजानंद थेरो, साजीदखान पठाण, शहजाद अन्वर, धनंजय मिश्रा, डॉ. जिशान हुसेन, डॉ. नीलेश पाटील, अशोक पटोकार, मार्तंडराव माळी, प्रा. राजाभाऊ देशमुख, अजय तापडिया, श्रीकांत पिसे, सै. अलीमोद्दीन हाजी तौफीक अली, हामीद हुसेन, अविनाश नाकट, वली मोहम्मद, प्रा. सरफराज खान, पुरुषोत्तम आवारे, श्याम अवस्थी, मनोहर पाटील, प्रभजितसिंह बछेर, सुरेश पाटील, सरदारखा महेमुदखा, अविनाश देशमुख, पी.जे. वानखडे, मो. अतिकुर रहेमान, जावेद जकारिया, अन्वर शेरा, आसीफ अहमद खान, कपिल रावदेव, अ‍ॅड. प्रवीण तायडे, प्रतिभा अवचार, प्रा. मधू जाधव, गौरव कोहचडे, शाहीद खान, शरद वानखडे, नितीन सपकाळ, निर्भय पोहरे, दीपकराज डोंगरे, सैयद नासीर यांच्यासह विविध सामाजिक संस्था व संघटनांचे पदाधिकारी-कार्यकर्ते सहभागी झाले होते.