शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जात, धर्म, पैसा व दारू हाच निवडणुकीचा आधार - डॉ. विठ्ठल वाघ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 14:16 IST

अकोला :  योग्य, अभ्यासू व्यक्ती निवडणुक जिंकत नाही. जात, धर्म, पैसा व दारूच निवडणुकीचा आधार आहे, असे मत प्रसिद्ध वºहाडी कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी लोकमत शी बोलताना व्यक्त केले. 

- नितीन गव्हाळे

अकोला :  योग्य, अभ्यासू व्यक्ती निवडणुक जिंकत नाही. जात, धर्म, पैसा व दारूच निवडणुकीचा आधार आहे, असे मत प्रसिद्ध वºहाडी कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी लोकमत शी बोलताना व्यक्त केले.  निवडणुकीत अनेक मुद्दे, समस्या चर्चिल्या जातात. आपल्या मतदारसंघातील प्रतिष्ठित, नावाजलेले कलावंत, या लोकसभा निवडणुकीकडे कशा पद्धतीने पाहतात, त्यांना कोणते महत्त्वाचे मुद्दे चर्चिले जायला हवे, याचा प्रातिनिधीक आढावा. एक कलावंत म्हणून तुम्ही सध्याच्या निवडणूक वातावरणाकडे कसे पाहता?लोकशाही पद्धतीने होत नाही. प्रादेशिक, राष्ट्रीय समस्या, प्रश्न, गरजा समोर ठेऊन निवडणुक लढविली पाहिजे. र्दुदैवाने तसे होताना दिसत नाही. खासदारांना गरजा, प्रश्न कसे सोडवाव्या, हे सांगता येत नाही आणि मतदारही विचारत नाहीत. विकासाचे ध्येय असल्याचे उमेदवार सांगतात. परंतु विकासाचे मार्ग, उपाययोजना कोणते आहेत. हे कोणी सांगत नाही. निवडणुक ही एक फास आहे. असे मी समजतो. योग्य, अभ्यासू व्यक्ती निवडणुक जिंकत नाही. जात, धर्म, पैसा व दारूच निवडणुकीचा आधार आहे.लोकसभा निवडणुकीत कोणते मुद्दे असायला हवेत?शेतकरी आत्महत्या, शेतीला पाणी, शेत मालावर प्रक्रिया करणारे उद्योग हे मुद्दे हवेत. परंतु त्याकडे जाणीवपुर्वक र्दुलक्ष केल्या जातात.नेरधामणा, जिगाव प्रकल्प रखडलेले आहेत. शहरात उड्डाणपुलांची गरज आहे. परंतु त्याकडे राजकीय पक्ष, उमेदवार प्राधान्य देत नाही. सुतगिरणी, साखर कारखाने सुरू झाले होते. ते टिकविता आले नाहीत. नेतृत्वाकडे जनतेविषयी आपुलकी, तळमळ, जाणीव नाही. अभ्यास नाही. केवळ विकासाच्या गप्पा केल्या जातात.तुमच्या क्षेत्राशी निगडित मुद्यांना राजकीय पक्ष किती महत्त्व देतात?अजिबात महत्व देत नाहीत. ज्यांच्यापासून फायदा होतो. भिती वाटते. अशांना महत्व दिल्या जाते. राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या १२ जागा असतात. त्यावर कला, साहित्य क्षेत्रातील कलावंतांना नियुक्त केले जात नाही. राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या नियुक्त्या केल्या जात. राजकीय पक्षांना कला, साहित्य, सांस्कृतिक, नाट्य क्षेत्राशी काहीही देणेघेणे नाही. त्यांच्या फायद्याच्या लोकांनाच महत्व दिल्या जाते.नवीन मतदारांना काय आवाहन कराल?लोकशाही बळकटीकरणासाठी मतदान करा. परंतु मतदान कोणाला करावे. हा प्रश्न आहे. लोकशाही अनुवांशिक ठरत आहे. एकही पक्ष त्या अपवाद नाही. बाप-लेक गाजतात..माय-लेक गाजोतात..आमच्याच कातड्याचे..सारे ढोल वाजोतात..अशी कविता म्हणत, त्यांनी विचारांपेक्षा भावनेच्या आहारी जाऊन मतदान करू नये.

टॅग्स :AkolaअकोलाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकakola-pcअकोलाinterviewमुलाखत