शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जाती-पातीच्या राजकारणात खरा कार्यकर्ता पडला मागे !

By admin | Updated: September 25, 2014 03:08 IST

अकोला लोकमत परिाजकीय पक्षाच्या पदाधिका-यांना खंत

अकोला : लोकशाहीमध्ये निवडणुका हा अपरिहार्य भाग आहे; परंतु निवडणुकांमध्ये विकासाचा मुद्या बाजूला पडून ऐनवेळी जातीपातीचा मुद्या पुढे येतो. यामध्ये दुर्दैवाने खरा कार्यकर्ता मागे पडतो. मतदारसंघाच्या विकासासाठी हे थांबविणे गरजेचे आहे. जातीच्या आधारावर नाही तर प्रामाणिक कार्यकर्त्याला प्रत्येक पक्षाने पुढे केले पाहिजे, असे मत विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी बुधवारी ह्यलोकमतह्णच्या मंचावर व्यक्त केले.ह्यलोकमतह्णच्यावतीने बुधवारी ह्यविधानसभा निवडणुकीत मुद्देच शिल्लक नाही, त्यामुळे सर्वच पक्षांकडून उमेदवार निवडण्यापासूनच सर्व प्रक्रिया जाती-पातीच्या आधारावर होत आहेह्ण या विषयावर परिचर्चा आयोजित करण्यात आली होती. या परिचर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे, काँग्रेसचे महानगर अध्यक्ष मदन भरगड, भाजपाचे महानगर अध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश मिश्रा, भारिपचे महापालिका गटनेते गजानन गवई आदी सहभागी झाले होते. सर्वच पदाधिकार्‍यांनी जातीपेक्षा विकासाच्या मुद्यावर भर दिला. जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडविण्याची धमक असणार्‍या कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे. सर्वच पक्षात चांगले काम करणारे कार्यकर्ते आहेत; परंतु या कार्यकर्त्यांच्या जातीला पाठबळ नसल्यामुळे ते मागे पडतात आणि गुणवत्ता नसतानादेखील जातीचे पाठबळ असणार्‍यांना संधी मिळते, हे कुठेतरी आता थांबणे गरजेचे आहे.