शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कॅसिनी इतिहासातील सर्वात यशस्वी मिशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 01:16 IST

देशात गरिबी आहे आणि आपण मंगळयान का पाठवितो, अशा प्रश्नांवर दहा वर्षांपूर्वी लोक चर्चा करीत असायचे. आता मात्र, याच लोकांना अवकाशयान राष्ट्राच्याच नव्हे, तर विश्‍वाच्या भवितव्यासाठी हे आवश्यक असल्याचे पटायला लागले आहे. शुक्रवारी नासाच्या शास्त्रज्ञांनी कॅसिनी अवकाशयानाची यशस्वी मोहीम संपविली. कॅसिनी हा कृत्रिम उपग्रह शनीवर आदळविण्यात आला.  इतिहासातील सर्वात यशस्वी ग्रहाच्या विज्ञान मोहिमेंपैकी ही एक मोहीम आहे, असे कुतूहलचे संचालक नितीन ओक यांनी सांगितले.

ठळक मुद्देनितीन ओक यांचे प्रतिपादन ‘द ऐंड फॉर न्यू बिगनिंग’ या विषयावर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: देशात गरिबी आहे आणि आपण मंगळयान का पाठवितो, अशा प्रश्नांवर दहा वर्षांपूर्वी लोक चर्चा करीत असायचे. आता मात्र, याच लोकांना अवकाशयान राष्ट्राच्याच नव्हे, तर विश्‍वाच्या भवितव्यासाठी हे आवश्यक असल्याचे पटायला लागले आहे. शुक्रवारी नासाच्या शास्त्रज्ञांनी कॅसिनी अवकाशयानाची यशस्वी मोहीम संपविली. कॅसिनी हा कृत्रिम उपग्रह शनीवर आदळविण्यात आला.  इतिहासातील सर्वात यशस्वी ग्रहाच्या विज्ञान मोहिमेंपैकी ही एक मोहीम आहे, असे कुतूहलचे संचालक नितीन ओक यांनी सांगितले.कुतूहल संस्कार केंद्राच्यावतीने शुक्रवारी सायंकाळी पालक व विद्यार्थ्यांसाठी ‘द ऐंड फॉर न्यू बिगनिंग’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. यामध्ये नितीन ओक यांनी कॅसिनी उपग्रहाविषयी माहिती दिली. कॅसिनी हा कृत्रिम उपग्रह शनीवर आदळविण्यात आला. या मोहिमेला २0 वर्ष लागली. या यशस्वी मोहिमेतील क्लिष्ट माहिती अत्यंत सोप्या भाषेत आणि अधिक रंजक करू न ओक यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.मनुष्याला नेहमी प्रश्न पडतो. मी कसा आलो. देवाने घडविला तर तो कसा, एक एक प्रश्नांची उकल करीत असतानाच सूर्य, पृथ्वी, आकाश, समुद्र असे विश्‍वाचे गूढ उकलायला लागले. यामध्ये काहीतरी तथ्य असावे, याकरिता पुढे त्याला अध्यात्म व धार्मिकतेची जोड देण्यात आली. पण, याचे मूळ विज्ञानच आहे. ग्रहांचे आणि उपग्रहांचे शोध मनुष्याने लावले. आता कृत्रिम कॅसिनी उपग्रहाने अनेक नवीन शोध लावलेत. यामध्ये सर्वात आनंदाची बाब म्हणजे अवकाशात पाणी असल्याचाही कॅसिनीने शोध लावला, असे ओक यांनी सांगितले.कॅसिनी २२ फूट उंच आणि १३ फूट जाडीचा होता. अवकाश यान कॅसिनी १५ सप्टेंबर रोजी अंतिम यात्रेला तयार होता. जेपीएल जेथे बांधले आणि ऑपरेट केले गेले, ते १९९७ मध्ये सुरू  करण्यात आले. ३0 जून २00४ मध्ये शनीच्या कक्षेत प्रवेश करण्यात आला. पुढे शनीच्या रिंगची संरचना प्रकट केली. त्याने बाह्य सौर प्रणालीमध्ये अवकाश यात्रेचे पहिले उद्दिष्ट पूर्ण केले.  मिथेन लेकची जमीनचाही शोध घेतला. तसेच पाणी प्रवाहित झाल्याचेही दिसले. ही विश्‍वासाठी आनंदाची बाब आहे आणि हा सर्वात मोठा शोध असल्याचे ओक म्हणाले.