शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीसाठी शिक्षकांना मिळणार कॅशलेस कार्ड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 02:48 IST

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी होणारा विलंब टाळण्यासाठी येत्या १ एप्रिल २0१८ पासून कॅशलेस प्रणाली सुरू केली जाणार आहे. त्यासाठी मार्चअखेरपर्यंत शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचार्‍यांना कॅशलेस कार्ड वितरित करण्यात येणार असल्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी विजुक्टा व महासंघाच्या पदाधिकार्‍यांसोबत झालेल्या बैठकीत सांगितले. 

ठळक मुद्देविलंब टळणार शिक्षणमंत्र्यांसोबत विजुक्टा पदाधिकार्‍यांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी होणारा विलंब टाळण्यासाठी येत्या १ एप्रिल २0१८ पासून कॅशलेस प्रणाली सुरू केली जाणार आहे. त्यासाठी मार्चअखेरपर्यंत शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचार्‍यांना कॅशलेस कार्ड वितरित करण्यात येणार असल्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी विजुक्टा व महासंघाच्या पदाधिकार्‍यांसोबत झालेल्या बैठकीत सांगितले. शिक्षण क्षेत्र व शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात शिक्षण सचिवांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीला शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, महासंघाचे अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख, विजुक्टाचे प्रांताध्यक्ष प्रा. डॉ. अविनाश बोर्डे, प्रा. संजय शिंदे, प्रा. विलास जाधव, प्रा. अनिल तळेकर, प्रा. टकले यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  बैठकीमध्ये अंशत: अनुदानित शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करण्याबाबत शिक्षण विभाग अनुकूल असून, वित्त विभागाशी पाठपुरावा करून बाजू मांडण्याचे शिक्षण विभागाने मान्य केले. नोव्हेंबर २00५ नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करण्याबाबत केंद्र शासनाकडे शिक्षण विभाग पाठपुरावा करणार आहे. २ मे २0१२ नंतर नियुक्त शिक्षकांना तातडीने मान्यता देण्याचे मान्य केले. विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांची यादी जाहीर करणे व माध्यमिकप्रमाणे अनुदानासाठी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यावर्षीची संचमान्यता प्रचलित निकषांनुसार करण्याचेही शिक्षण विभागाने मान्य केले. १७१ मान्यता पदांच्या वेतनाची तरतूद दिवाळीपूर्वी करण्याचे, शालार्थ प्रणालीत प्रलंबित शिक्षकांची नावे दाखल करण्याचे निर्देश ना. तावडे यांनी दिले. डीसीपीएस खाती अद्ययावत ठेवण्याची, आयटी शिक्षकांना मान्यता, प्लॅन संदर्भातील प्रशासकीय अडचणी दूर करण्याबाबत प्रयत्न आणि सरसकट निवडश्रेणी प्रस्ताव पडताळणी, ४२ दिवसांच्या रजा, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीबाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली, अशी माहिती विजुक्टाचे जिल्हाध्यक्ष प्रा. गणेश वानखडे, प्रा. संजय देशमुख, प्रा. संजय गोळे, प्रा. प्रवीण ढोणे, प्रा. डी.एस. राठोड, प्रा. संतोष अहिर यांनी दिली.