शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

खून प्रकरणात दोघांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 01:57 IST

जुन्या वितुष्टावरून वाद होऊन कुर्‍हाडीने कुटासा येथे विलास बाबुसा गावंडे यांची हत्या केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने अकोट येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांनी  १४ सप्टेंबर रोजी दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जन्मठेप झालेल्या आरोपीचे नाव पुरण बागडे व मनोज बागडे असे आहे. 

ठळक मुद्देकुटासा येथील घटना अकोट न्यायालयाचा निकाल

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : जुन्या वितुष्टावरून वाद होऊन कुर्‍हाडीने कुटासा येथे विलास बाबुसा गावंडे यांची हत्या केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने अकोट येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांनी  १४ सप्टेंबर रोजी दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जन्मठेप झालेल्या आरोपीचे नाव पुरण बागडे व मनोज बागडे असे आहे. दहीहांडा पोलीस स्टेशन अंतर्गत कुटासा येथे आरोपी सोबत मृतक विलास गावंडे यांचा जुना वाद होता. तसेच मृतकाच्या पत्नीला गाणे वाजविणे यावरुन सुध्दा वाद झाले होते. ३ नोव्हेंबर २0१५ रोजी  विलास गावंडे पहाटे शौचास जाण्याकरिता गेला होता. दरम्यान, विलास याने आरडाओरड केली, त्यामुळे त्याची पत्नी अनिता गावंडे ही धावत आली असता, तिने पतीला मनोज व पुरण हे दोघेजण कुर्‍हाडीने वार करीत असल्याचे पाहिले. त्यामुळे आरडाओरड करुन तिने शेजारच्या लोकांना उठविले. कुर्‍हाडीच्या घावाने  गंभीर जखमी झालेल्या विलासला रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी अनिता गावंडे हिच्या फिर्यादीवरुन दहीहांडा पोलिसांनी आरोपी मनोज पुरण बागडे, पुरण सखाराम बागडे, संजय पुरण बागडे, राजरत्न ऊर्फ नंदू पुरण बागडे यांच्या विरुद्ध भादंवि ३0२, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या  प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस.आर. दोनकलवार यांनी दोषारोपपत्र दाखल केले. अकोट येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांच्या समोर या हत्याकांडाची सुनावणी घेण्यात आली. त्यामध्ये १0 साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकील व आरोपींच्या वकिलांचा युक्तिवादानंतर  न्यायमूर्ती सुब्रमण्यम यांनी हत्येचा गुन्हा सिद्ध झाल्याने पुरण बागडे, मनोज बागडे यांना जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी २५ हजार रुपये दंड ठोठावला. तसेच संजय बागडे व राजरत्न बागडे यांच्या विरुद्ध आरोप सिध्द न झाल्यामुळे त्यांची निर्दोष सुटका केली. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अँड. श्याम खोटरे यांनी काम पाहिले.