शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कापूस व्यापा-याची गाडी पळवली

By admin | Updated: January 12, 2016 01:42 IST

पैसे नसल्याने प्रयत्न फसला; चार आरोपींवर गुन्हा.

देऊळगावराजा : कापूस व्यापार्‍यांचे कर्मचारी इंडिका गाडीतून २0 लाख रुपये बँकेतून घेऊन जात असल्याची पक्की खबर मिळाल्याने चार चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवत गाडीच पळवली; मात्र बँकेतून पैसेच न मिळाल्याने चोरांचा प्रयत्न फसल्याचा प्रकार देऊळगावराजा येथे सोमवारी घडला. सिंदखेडराजा रोडवरील नवीन कॉटन जिनिंगचे कर्मचारी शेतकर्‍यांचे कापसाचे पैसे चुकते करण्यासाठी दे.राजा एसबीआय बँकेच्या शाखेतून २0 लाख रुपये काढण्यासाठी आले होते; मात्र बँकेमध्ये कनेक्टीव्हीटी सुविधा बंद पडल्याने त्यांना रक्कम मिळाली नाही. इंडिका गाडीतून दोन कर्मचारी परत नवीन कॉटन जिनिंगकडे परत निघाले. त्यांच्यावर पाळत ठेवून असलेले दोघे जण मोटरसायकलने निघाले. गुगळादेवी मंदीराकडे जाणार्‍या रस्त्यासमोर चोरट्यांनी इंडिका गाडी अडवून दोन कर्मचार्‍यांना बंदुकीचा धाक दाखवून गाडीत घुसले. दरम्यान कॉटन जीनिंगच्या व्यवस्थापकाचा फोन केला; मात्र फोन उचलला जात नसल्याने त्यांचा संशय बळावला. त्यांनी पोलिसांना प्रकार सांगीतल्यानंतर एसडीपीओ प्रशांत परदेशी ठाणेदार कैलास ओहळ यांनी विभागातील सर्व पो.स्टे.ला संदेश देत नाकाबंदी केली. सुलतानपूर जवळ इंडिका गाडी गरम होवून बंद पडली. वीस लाख रुपये सुध्दा मिळाले नाही. गाडीही बंद पडल्याने इंडिकातील दोघे बोलेरो गाडीतील दोघे असे चार चोरटे गाड्या सोडून सुलतानपूर नजिक जंगलाच्या दिशेने पळाले. मात्र पोलिसांनी गजानन मच्छिंद्रनाथ पवार (२५) रा.जालना आणि गंगानगर नेवासा येथील निलेश एकनाथ शेंडगे (२३), संदीप कचरु भालेराव (२२), अविनाश अरुण खंडागळे (२१) यांना ताब्यात घेतले. पोलिस अधिक्षक संजय बावीस्कर अप्पर पो.अ.श्‍वेता खेडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पत्रकार परिषदेत घटनेची माहिती दिली. संतोष भटू पाटील, प्रशांत तायल यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी चारही आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.