शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

मालगाडीच्या गार्डचा डबा रुळावरून घसरला!

By admin | Updated: July 13, 2017 01:17 IST

पाच दिवसांत तिसरी घटना

लोकमत न्यूज नेटवर्ककुरूम : मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळांतर्गत येणाऱ्या मूर्तिजापूर-बडनेरादरम्यान कुरूम रेल्वे स्टेशनवर गिट्टी वाहून नेणाऱ्या मालगाडीच्या गार्डचा डबा गिट्टी डेपोच्या भिंतीला धडकल्याने मालगाडी रुळावरून घसरल्याची घटना १२ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता घडली.

कुरूम रेल्वे स्टेशनजवळ मालगाडी रुळावरून घसरण्याची मागील पाच दिवसांतील ही तिसरी घटना आहे, हे विशेष.यापूर्वी ७ जुलै रोजी लुप लाइनवर जाणारी मालगाडीची वॅगन रुळावरून घसरली होती. यामुळे नागपूरकडे जाणाऱ्या गाड्या दोन ते अडीच तास उशिराने धावल्या होत्या. त्यानंतर ११ जुलै रोजी दुपारी गिट्टी डेपोतून गिट्टी भरून बडनेराकडे जाणाऱ्या मालगाडीची वॅगन त्याच डाउन लुप लाइनवर रुळावरून घसरली होती. त्यामुळेसुद्धा नागपूरकडे जाणाऱ्या गाड्या दोन ते अडीच तास उशिराने धावल्या होत्या. या घटनेपाठोपाठ १२ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता सदर मालगाडी गिट्टी खाली करून परत डेपोमध्ये गेली असता तेथे उभी करीत असताना अप सायडिंगच्या लाइनवर गार्डचा डबा डेपोच्या भिंतीला धडकल्याने मालगाडी रुळावरून खाली उतरली. सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मेनअप व डाउन लाइन सुरळीत असल्याने गाड्यांची रहदारी सुरळीत चालू आहे. या घटनेची माहिती मिळताच बडनेरा रेल अभियंता प्रमोद वाढेकर हे त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले असून, हे वृत्त लिहीपर्यंत गार्डचा डबा रुळावर ठेवण्याचे काम सुरू होते.