शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

सीआयडीने घेतले दस्तावेज ताब्यात

By admin | Updated: January 19, 2017 02:53 IST

चेतन मनतकार आत्महत्या प्रकरणाचे दस्तावेज सीआयडीने ताब्यात घेतले, तर एमआयडीसी पोलीस स्टेशनचा प्रभार बुधवारी किशोर शेळके यांच्याकडे देण्यात आला.

अकोला, दि. १८- दुचाकी चोरी प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीने एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्येच पिकांवर फवारणीचे विषारी औषध प्राशन केल्यानंतर त्याचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने सुरू केला असून, चेतन मानतकर आरोपी असलेल्या प्रकरणाचे दस्तावेज सीआयडीने बुधवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनमधून ताब्यात घेतले, तर एमआयडीसी पोलीस स्टेशनचा प्रभार बुधवारी किशोर शेळके यांच्याकडे देण्यात आला आहे.एमआयडीसी पोलिसांनी दुचाकी चोरी प्रकरणात गोरक्षण रोडवरील रहिवासी चेतन मानतकर (२0) आणि लहान उमरीतील रहिवासी रॉबिन्सन बोर्डे (२७) या दोघांना अटक केली होती. या दोन्ही चोरट्यांकडून पोलिसांनी चोरीच्या दहा दुचाकी जप्त केल्या होत्या. सदर आरोपी १७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत असताना पोलीस कर्मचारी पंकज तायडे, रवी खंडारे आणि सलीम पठाण या तिघांनी त्यांना एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणले. यावेळी तीनही पोलिसांनी कर्तव्यात कसूर केल्याने चेतन मानतकर याने शौचाला जाण्याचे कारण सांगून शौचालयात असलेले विषारी औषध प्राशन केले होते. त्यानंतर मंगळवारी सकाळीच चेतनचा मृत्यू झाला.या प्रकरणात पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी गांभीर्याने लक्ष घालून दोषी असलेल्या पंकज तायडे, रवी खंडारे आणि सलीम पठाण या तिघांना तत्काळ निलंबित केले, तर ठाणेदार शिरीष खंडारे यांना नियंत्रण कक्षात बदली केली. त्यानंतर सदर प्रकरणाचा तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने सुरू केला आहे. पोलिसांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यतापोलीस अधिकारी कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल होण्याचे संकेत आहेत. पोलिसांनी पोलीस कोठडीमध्ये चेतनला मारहाण केली का, या सर्व दिशेने प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांनी चौकशी केली आहे, तर आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागानेही दुचाकी चोरी प्रकरणासह चेतनच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, यामध्ये चेतनविरुद्ध समोर येणार्‍या अहवालावरून पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.