शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांचे मतदारांशी ‘नो अटॅचमेंट’

By admin | Updated: October 9, 2014 01:26 IST

प्रत्यक्ष भेटीऐवजी प्रचार सभांवर भर.

डॉ. किरण वाघमारे / अकोलानिवडणूक म्हटली की मतदार हा सर्वात महत्त्वाचा. मतदारांशी थेट संपर्क साधून त्यांना आपल्या बाजूने वळविण्याकडे उमेदवारांचा कल असतो; परंतु आता मतदारांशी थेट भेट घेण्याऐवजी मोठ-मोठय़ा प्रचार सभांवरच उमेदवार अधिक भर देत असल्याचे चित्र आहे. मतदारांशी अटॅचमेंट नसल्यामुळे उमेदवारांप्रति मतदारांच्या मनात फारसी आपुलकी पहावयास मिळत नाही. पूर्वी निवडणूक म्हटली की, प्रत्येक उमेदवाराचा भर रहायचा तो अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचण्याचा. जितक्या जास्त मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क करता येईल, तेवढी आपली बाजू मजबूत होऊ शकते, याचा उमेदवारांना विश्‍वास होता. यासाठी उमेदवार पदयात्रा काढत असत. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत ते प्रत्येक मतदारांच्या घरापर्यंत पोहचण्याचा त्यांचा प्रयत्न असे. प्रत्येक गल्ली, मोहल्ला अथवा कॉलनीमध्ये छोटेखानी सभा ठरलेलीच असे. चहा-पाणी आणि पान-सुपारीच्या कार्यक्रमासोबत उमेदवार मतदारांशी संपर्क साधत असे. घरातील प्रत्येक व्यक्तीची उमेदवार आस्थेने चौकशी करीत असे. मतदारांनादेखील उमेदवार आपल्या घरी आला की चांगले वाटत असे. उमेदवाराचे ते चांगल्याप्रकारे स्वागत करीत असत. उमेदवाराशी थेट बोलता येत असल्यामुळे मतदारांनादेखील उमेदवाराबद्दल सहानुभूती वाटत असे. याचा परिणाम अनेकवेळा मतपेटीमध्ये दिसून येत असे. आताच्या निवडणुकीत उमेदवार प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहचण्यापेक्षा मोठय़ा जाहीर सभांवरच अधिक भर देत आहेत. आपल्या पक्षाच्या मोठय़ा नेत्यांची सभा आयोजित करण्यातच या उमेदवारांमध्ये चढाओढ आहे. काही उमेदवार रॅली काढतात; परंतु ती रॅली नुसतीच रस्त्यांवरून फिरते. त्याचा मतदारांवर कितपत प्रभाव पडतो, हा संशोधनाचा विषय आहे. काही उमेदवार पदयात्रा काढतात; परंतु ते नुसतेच हात जोडून किंवा हात हलवित रस्त्यावरून धावत असतात. प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहचण्याच्या भानगडीत ते पडत नाहीत. उमदेवार आपल्या घरापर्यंत येऊन आपली दखल घेण्यास फारसा उत्सुक नाही, हे माहीत असल्यामुळे मतदारदेखील उमेदवाराप्रति फारशी सहानुभूती बाळगत नाही.आता मोबाईल, इंटरनेट आणि व्हॉटस अँपचा जमाना आहे. काही उमेदवार आणि पक्ष या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मतदारांशी संपर्क करीत आहेत. या साधनांच्या माध्यमातून मतदारांची मते कदाचित मिळविता येतील; परंतु मतदारांचे मन कसे जिंकणार? सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवार आणि मतदारांमध्ये वाढलेले अंतर प्रकर्षाने जाणवत आहे.