शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

उमेदवारांचे डोळे पक्ष निधीकडे!

By admin | Updated: February 17, 2017 02:41 IST

नेत्यांनी साधली चुप्पी; कार्यकर्त्यांची कोंडी

अकोला, दि. १६-महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीने कमालीचा वेग घेतला आहे. राजकीय पक्षांकडून प्राप्त होणार्‍या पक्ष निधीतून संबंधित उमेदवार प्रचार साहित्य व इतर बाबींवर होणारा किरकोळ खर्च भागवतात. पाच दिवसांवर मतदानाची प्रक्रिया येऊन ठेपली असताना अद्यापपर्यंत कोणत्याही पक्षाच्या उमेदवारांना पक्ष निधी मिळाला नसल्यामुळे निवडणुकीत ऐन वेळवर दगाफटका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासंदर्भात पक्षाच्या नेत्यांनी चुप्पी साधणे पसंत केले असून जीवाचे रान करणार्‍या कार्यकर्त्यांंची मात्र कोंडी होत आहे. महापालिकेच्या आखाड्यात यंदा प्रथमच सर्व राजकीय पक्षांनी युती किंवा आघाडीच्या फंदात न पडता स्वबळावर दंड थोपटले आहेत. भाजप-शिवसेनेसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,भारिप-बमसंने प्रतिस्पध्र्यांना चारी मुंड्या चीत करण्यासाठी जोरदार तयार केल्याचे चित्र आहे. अर्थातच, अशा अटीतटीच्या सामन्यासाठी निवडणुकीला सामोरे जाताना राजकीय पक्षाचे उमेदवार सर्व ताकद झोकून कामाला लागले आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी विविध साहित्याची खरेदी करणे, वाहने, त्यावरील भोंगे, झेंडे, पताका, बॅनर-फलक तसेच कार्यकर्त्यांंचे चहापान आदी विषयांसाठी उमेदवारांना खर्च करावा लागत आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणार्‍या उमेदवारांना आर्थिक बळ दिल्यास संबंधित उमेदवाराच्या विजयाबद्दल पक्षालासुद्धा हमी राहते, असा सार्वत्रिक अनुभव आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणूक रिंगणातील उमेदवारांसाठी पक्ष निधीची तरतूद केली जात असल्याचे बोलल्या जाते. येत्या २१ फेब्रुवारीला मतदान होणार असून प्रचार सभा, कॉर्नर बैठकांसह छुप्या आघाड्यांसाठी होणार्‍या हालचालींनी वेग घेतला आहे. अशा स्थितीत अनेक उमेदवारांना आर्थिक चणचण भासत असल्यामुळे त्यांना पक्षाकडून कधी निधी प्राप्त होतो, याकडे त्यांचे डोळे लागले आहेत. उमेदवारांचा हात आखडताराजकीय पक्ष कोणताही असो, त्यांनी उभे केलेल्या पॅनेलमधील अनेक उमेदवार आर्थिकदृष्ट्या परिपूर्ण नसल्याचे आता समोर येत आहे. पक्षाकडून उमेदवारी मागताना मोठ-मोठय़ा गप्पा करणार्‍यांचे पितळ प्रचारदरम्यान उघडे पडले आहे. प्रचार साहित्य असो वा कार्यकर्त्यांंचे चहापान किंवा जेवणासाठी काही उमेदवारांचे हात खिशात जात नसल्यामुळे कार्यकर्त्यांंमध्ये नाराजीचा सूर आहे. रक्कम जमा केली; पण..निवडणुकीत होणारा खर्च लक्षात घेता काही उमेदवारांनी आपसात रक्कम जमा केली. ही रक्कम ऐन मतदानाच्या चार दिवसांपूर्वीच संपल्यामुळे उमेदवार सैरभैर झाले आहेत. आता पुढील खर्च नेमका कसा व कोणी करायचा, असा प्रश्न उमेदवारांमध्ये निर्माण झाल्याचे चित्र आहे.