शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांना मतदान केंद्र प्रतिनिधीच सापडेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 12:59 IST

येत्या १८ एप्रिल रोजी लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असली, तरी अद्यापही काही उमेदवारांना मतदान कें द्र प्रतिनिधीच सापडत नसल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.

अकोला: मतदानाच्या दिवशी मतदार यादीत नाव नाही, मागच्या वेळी होते, आता नाही, असे म्हणून मतदानापासून निवडणूक आयोगाने वंचित ठेवल्याचा ठपका बसू नये म्हणून निवडणूक आयोगाने निवडणुकीपूर्वीच मतदान केंद्रनिहाय शासकीय ‘बीएलओं’ची नियुक्ती केली. प्रत्येक राजकीय पक्षानादेखील केंद्रनिहाय मतदान प्रतिनिधी नेमण्याचे निर्देश दिले होते. येत्या १८ एप्रिल रोजी लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असली, तरी अद्यापही काही उमेदवारांना मतदान कें द्र प्रतिनिधीच सापडत नसल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. प्रतिनिधींच्या शोधासाठी काही उमेदवारांवर भटकंती करण्याची वेळ आली आहे.देशपातळीवर आयोगाने सप्टेंबर महिन्यात मतदार पुनरीक्षण मोहीम राबवून नवीन मतदारांची नोंदणी करून घेण्यात आली होती. त्यावेळी यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी विविध प्रकारचे अर्ज मतदारांकडून भरून घेण्यात आले होते. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केल्यानंतर आयोगाने त्यावर हरकती व सूचना मागितल्या होत्या. याकडे मतदारांसह राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केल्याचे चित्र होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केल्यानंतर काही राजकीय पक्ष व त्यांच्या कार्यकर्त्यांना जाग आली. तत्पूर्वी ही परिस्थिती निर्माण होणारच, हे गृहीत धरून निवडणूक आयोगाने प्रत्येक राजकीय पक्षाला केंद्रनिहाय मतदान प्रतिनिधी नेमण्याचे निर्देश दिले होते. त्यानुषंगाने ठरावीक पक्षांनी मतदान केंद्र प्रतिनिधींची नियुक्ती करून उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घेतली. घटनेनुसार निवडणूक लढण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. यंदा अकोला लोकसभा मतदारसंघातून विविध राजकीय पक्षांकडून सहा तर अपक्ष म्हणून पाच उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. यापैकी बोटावर मोजता येणारे ठरावाक राजकीय पक्ष वगळता इतर उमेदवारांकडे मतदान केंद्रासाठी प्रतिनिधीच उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे.पैसे देऊनही कार्यकर्त्यांची वानवा!निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणाऱ्या प्रत्येक उमेदवाराचा आत्मविश्वास दुणावलेला असतो. काही निव्वळ प्रसिद्धीसाठी उभे राहतात. अशाच काही उमेदवारांनी मतदान केंद्र प्रतिनिधी नेमण्यासाठी कार्यकर्त्यांची शोधमोहीम सुरू केली. प्रतिनिधीसाठी पैसे देण्याचे आश्वासन देऊनही कार्यकर्ते तयार होत नसल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक