शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांनो ‘एबी फॉर्म’ जोडताय, जरा सांभाळून..!

By admin | Updated: January 31, 2017 02:13 IST

पहिल्या उमेदवाराचा ‘एबी फॉर्म’ धरणार गृहीत.

अकोला, दि. ३0- महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरण्यासाठी इच्छुकांची धावपळ, लगबग सुरू झाली आहे. अशा स्थितीत कागदपत्रांची जुळवाजुळव करताना दमछाक होत असून, ज्या ह्यएबी फॉर्मह्णसाठी जीवाचे रान केले जाते, तो अर्ज नामनिर्देशनपत्राला लावताना जो उमेदवार पहिल्यांदा सादर करेल त्याचाच अर्ज अधिकृत समजल्या जाणार असल्याने उमेदवारांनो जरा सांभाळून, असे म्हणण्याची वेळ आली आहे. महापालिका निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. महापालिका क्षेत्राची हद्दवाढ होऊन २0 प्रभागांची निर्मिती झाली. प्रत्येक प्रभागातून चार या प्रमाणे ८0 उमेदवार निवडून द्यावे लागतील. मनपाने २0 प्रभागांसाठी विविध पाच ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार २७ जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांना नामनिर्देशनपत्र (उमेदवारी अर्ज) दाखल करता येतील. यासाठी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंतचा कालावधी निश्‍चित करण्यात आला आहे. यंदा प्रथमच ऑनलाइन पद्धतीने नामनिर्देशनपत्र सादर करावे लागेल. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून ती संबंधित झोनच्या निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे सादर करायची आहे. उमेदवारी अर्ज सादर करताना संबंधित उमेदवाराला ज्या पक्षाकडून ह्यएबी फॉर्मह्ण दिल्या जाईल तो फॉर्म नामनिर्देशनपत्राला जोडावा लागणार आहे. या ठिकाणी एकाच पक्षाच्या दोन उमेदवारांनी एबी फॉर्म सादर केल्यास ज्याचा पहिला अर्ज प्राप्त झाला असेल त्या उमेदवाराचा अर्ज अधिकृत मानल्या जाणार आहे. त्यामुळे संबंधित राजकीय पक्षाकडून एबी फॉर्म प्राप्त करताना तो एकाच उमेदवाराला दिल्या जावा, अशी चर्चा इच्छुकांमध्ये सुरू झाली आहे.सर्व्हर 'डाउन' होण्याची भीतीमहापालिका निवडणुकीसाठी ऑनलाइन पद्धतीने उमेदवारी अर्ज कोणत्याही ठिकाणहून भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. राजकीय पक्षांकडून एबी फॉर्म प्राप्त होण्यास जाणीवपूर्वक विलंब होण्याची शक्यता लक्षात घेता इच्छुक उमेदवारांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज सादर करण्यावर मतेमतांतरे सुरू झाली आहेत. अशा स्थितीत ऑनलाइन अर्ज भरण्यास उशीर करून शेवटच्या दिवशी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी गर्दी झाल्यास त्या दिवशी सर्व्हरवर ताण येऊन त्याची गती संथ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट न पाहता उमेदवारांनी त्यांचे अर्ज भरण्याची गरज आहे.