शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांच्या गुन्हे, संपत्तीचे प्रतिज्ञापत्र मतदान केंद्राबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 12:28 IST

मतदारांनी जागरुकपणे मतदान करावे, यासाठी हा उपक्रम निवडणूक विभागाकडून राबवला जातो.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषदांमध्ये गुन्हेगारी पृष्ठभूमी असलेल्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लोकशाही प्रक्रियेत असामाजिक तत्त्वांचे प्रमाण वाढत आहे. याबाबत मतदारांमध्ये जनजागृती होऊन योग्य उमेदवारालाच मतदान व्हावे, यासाठी गुन्हे, संपत्ती व इतरही वैयक्तिक माहितीचे प्रतिज्ञापत्र मतदान केंद्राबाहेर पाहण्यासाठी खुले ठेवले जाणार आहे. मतदारांनी जागरुकपणे मतदान करावे, यासाठी हा उपक्रम निवडणूक विभागाकडून राबवला जातो.जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक लढणाऱ्यांच्या गुन्हेगारी माहितीचे प्रतिज्ञापत्र मतदान केंद्राबाहेर झळकत असले तरी मतदारांनी त्या आरोपींनाच विजयी केल्याचे २०१७ मध्ये राज्यातील २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत घडले आहे.विशेष म्हणजे, त्यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, पळवून नेणे, महिलांचे शोषण, फसवणूक, दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा समावेश आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांशी ते संबंधित आहेत. त्याची पुनरावृत्ती जिल्ह्यात होऊ नये, याची खबरदारी घेण्याची वेळ मतदारांवर आली आहे.राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार उमेदवारांनी प्रतिज्ञापत्रात दिलेली वैयक्तिक माहिती मतदारांना दिसण्यासाठी मतदान केंद्रांत दर्शनी भागावर लावली जाते. मतदारांमध्ये जनजागृतीचा हा भाग आहे. निवडणूक आयोगाकडून ती जबाबदारी पार पाडली जात असली तरी मतदार मात्र जबाबदारी विसरून आरोपींनाच विजयी करीत असल्याची धक्कादायक माहिती आहे. महाराष्ट्रातील विजयी उमेदवारांच्या माहितीचे विश्लेषण ‘असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म’ या संस्थेने केले.विजयी उमेदवारांची प्रतिज्ञापत्रानुसार गुन्हेगारी पृष्ठभूमी, आर्थिक आणि वैयक्तिक माहिती संस्थेने घेतली. जिल्हा परिषदांच्या १,४३१ विजयी उमेदवारांच्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले. त्यामध्ये अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या. राज्यातील एकूण विजयी गुन्हेगार उमेदवारांची पक्षनिहाय आकडेवारीही मतदारांच्या सद्सद्विवेक बुद्धीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद