शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कर्करोगावरील औषधे होणार स्वस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 13:43 IST

अकोला: कर्करोगावरील खर्चिक उपचार आणि महागड्या औषधांमुळे अनेक रुग्णांना योग्य व निरंतर उपचार घेणे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेता केंद्र सरकारने कर्करोगावरील औषधांच्या विक्रीवर असलेल्या ट्रेड मार्जिनची ३० टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

अकोला: कर्करोगावरील खर्चिक उपचार आणि महागड्या औषधांमुळे अनेक रुग्णांना योग्य व निरंतर उपचार घेणे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेता केंद्र सरकारने कर्करोगावरील औषधांच्या विक्रीवर असलेल्या ट्रेड मार्जिनची ३० टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, कर्करोगावरील औषधे स्वस्त होणार असून, या नव्या किमती ८ मार्चपासून लागू होणार असल्याची माहिती आहे.देशात १.५ दशलक्ष कर्करोगाचे रुग्ण असून, २०१८ मध्ये आठ लाख लोकांचा कर्करोगामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. वीस वर्षांत ही संख्या दुप्पट होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. एकीकडे कर्करोगाने पीडित रुग्णांची वाढती संख्या अन् महागड्या उपचारामुळे अनेक रुग्ण जगण्याची आस सोडून देतात. ही बाब लक्षात घेता केंद्र सरकारने कर्करोगग्रस्तांना मोठा दिलासा देत ४२ अ‍ॅन्टी-कॅन्सर औषधांच्या किमती नियंत्रणात आणण्याचा निर्णय घेतला आहे. कर्करोगासंदर्भात केंद्र सरकारने गठित केलेल्या एका समितीने या सर्व बाबींचा अभ्यास केल्यावर कर्करोगावरील औषध परवडणाऱ्या दरात असावी, अशी शिफारस नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अ‍ॅथॉरिटीकडे (एनपीपीए) केली होती. त्यानुसार केंद्रीय खत आणि रसायन मंत्रालयातर्फे ४२ कॅन्सर औषधांच्या किमती नियंत्रित करण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात डिपार्टमेंट आॅफ फार्मास्युटिकल्सने नोटिफिकेशन जारी केले आहे.१६ टक्क्यांपर्यंत ट्रेड मार्जिन अनिवार्यट्रेड मार्जिनमध्ये कपात करण्यात आलेल्या ४२ औषधांवर ८ ते १६ टक्के ट्रेड मार्जिन लावण्याचे अनिवार्य राहणार असल्याची माहिती आहे. या यादीत समाविष्ट नसलेल्या इतर औषधांवर कंपन्या इच्छेनुसार ट्रेड मार्जिन लावू शकणार असल्याची माहिती आहे.

सरकारने यापूर्वीच हृदयरोगास आणि स्टेंट्स नियंत्रणात आणले आहे. आता कर्करोगाच्या औषधांचे दर नियंत्रणात आणल्याने गरीब रुग्णांना याचा फायदा होईल.- डॉ. व्ही. फारुकी, आरोग्य उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला मंडळ.

 

टॅग्स :Akolaअकोलाmedicinesऔषधंcancerकर्करोग