शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान लोकआवास योजनेसाठीची निविदा रद्द!

By admin | Updated: April 14, 2016 02:08 IST

अकोला मनपाच्या स्थायी समिती सभेतील निर्णय.

अकोला: पंतप्रधान लोकआवास योजनेसाठी महापालिका प्रशासनाने मंजूर केलेल्या शून्य कन्सलटन्सी कंपनीच्या निविदेमध्ये अनेक त्रुटी आणि दोष असल्यामुळे ही निविदा मनपा स्थायी समिती समितीने सर्वानुमते रद्द करून परिपूर्ण निविदा बोलाविण्याचा निर्णय घेतला. बुधवारी दुपारी मनपाच्या टिपू सुलतान सभागृहात स्थायी समितीची सभा बोलाविण्यात आली होती. सभेचा मुख्य विषय प्रधानमंत्री लोकआवास योजनेंतर्गत सर्वांसाठी घरे कृती आराखडा तयार करणे, तांत्रिक सर्वेक्षण तयार करून अंदाजपत्रक तयार करणे आदींबाबत महापालिका प्रशासनाने निविदा बोलाविल्या होत्या. तीन कंपन्यांकडून महापालिकेला निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी महापालिका प्रशासनाने शून्य कन्सलटन्सी कंपनीची निविदा मंजूर केली होती; परंतु या निविदेमध्ये अनेक दोष आणि त्रुटी असल्यामुळे मनपा स्थायी समितीने बुधवारच्या सभेमध्ये ही निविदा रद्द करण्यात आली आणि नवीन निविदा बोलाविण्याचा निर्णय घेण्यात आला. निविदेमध्ये डीपीआर तयार करून शासनाकडे सादर करणे व पूर्ण अकोल्यातील ८0 स्लम व ८ अघोषित स्लम भागांचा संपूर्ण प्रकल्प तयार करणे, त्यात बीपीएल, एपीएल किती राहतील, याचा कृती आराखडा तयार करणे व घर बांधकामाचा खर्च, जागेचे क्षेत्रफळ, बांधकामावर देखरेख व निगराणी या बाबींचा समावेश करून पुनर्निविदा काढण्याबाबत स्थायी समितीने निर्णय घेतला व ठराव सर्वानुमते पारित केला. पंतप्रधान लोकआवास योजनेचा विषय काँग्रेसचे स्थायी समिती सदस्य अब्दुल जब्बार यांनी मांडला. त्याला भारिप-बहुजन महासंघाचे नगरसेवक रामा तायडे यांनी अनुमोदन दिले. पंतप्रधान लोकआवास योजनेंतर्गत बनविण्यात येणार्‍या घरांसाठीचे सर्वेक्षण करण्यापासून ते संपूर्ण बांधकाम होईपर्यंत एकाच संस्थेचे संपूर्ण नियंत्रण असायला हवे. याबाबत सभेत चर्चा करण्यात आली. सभेला महापौर उज्ज्वला देशमुख, स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल, उपायुक्त समाधान सोळंके, उपायुक्त सुरेश सोळशे, नगरसचिव अनिल बिडवे, स्थायी समिती सदस्य सतीश ढगे, बाळ टाले, दिलीप देशमुख, बबलू जगताप, राजकुमारी मिश्रा, मंगला म्हैसने, गायत्रीदेवी मिश्रा, हाजराबी, साफीयाखातून आझाद खान, सुरेश अंधारे, आशिष पवित्रकार यांच्यासह शहर अभियंता खान, अजय गुजर आदी उपस्थित होते.