शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त धान्य दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द

By admin | Updated: April 20, 2017 01:38 IST

अकोला : पातूर तालुक्यातील दिग्रस बु. येथील स्वस्त धान्य दुकानातील धान्य वाटपाबाबतच्या नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या.

अकोला : पातूर तालुक्यातील दिग्रस बु. येथील स्वस्त धान्य दुकानातील धान्य वाटपाबाबतच्या नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारीची दखल घेऊन केलेल्या चौकशीअंती जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे यांनी सदर दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द करण्याचा आदेश पातूरच्या तहसीलदारांना दिला आहे, तसेच सदर दुकानदाराकडून एक लाख एक हजार ९३० रुपये शिधापत्रिकाधारकांना कमी वाटप केलेल्या धान्याच्या बाजारभावातील फरकाची रक्कम वसूल करण्याचेही आदेशित केले आहे.पातूर तालुक्यातील दिग्रस बु. येथील सरकारी स्वस्त धान्य दुकानातील आॅक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर २०१६ या तीन महिन्यांत धान्य वाटप केले नसल्याची तक्रार भारिपचे तालुका सचिव जीवन उपर्वट व मंगेश इंगळे यांनी तहसीलदार यांच्याकडे दिली होती. त्यानंतर त्यांनी चौकशी करून या स्वस्त धान्य दुकानात वाटप केले नसल्याचे दिसून आले, तसेच तेथील वजन-मापेसुद्धा प्रमाणित केली नसल्याचे आढळून आले. गावातील शिधापत्रिकाधारकांनी दिलेल्या बयाणानुसार रास्त भाव दुकानदार महिन्यातून दोन ते तीन दिवसच धान्य वाटप करतात व दोन-तीन महिन्यांतून एकदाच वाटप करतात, असे नमूद केले. या तक्रारीसंदर्भात दिग्रस बु. येथील उपसरपंच भारती सुदर्शन गवई, पोलीस पाटील, गट ग्रामपंचायत दिग्रस खुर्द हिंगणा येथील सरपंच सुमेध प्रमोद इंगळे यांनीसुद्धा तहसील कार्यालयात जाऊन या प्रकारचे लेखी जबाब सादर करून कारवाई करण्याची मागणी केली होती. यानंतर गावातील सामाजिक कार्यकर्ते माणिक गवई, तोताराम गवई, सुदर्शन गवई, मंगेश इंगळे व जीवन उपर्वट यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी रास्त भाव दुकानावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आपण आत्मदहन करू, असा इशारा दिला होता. या निवेदनाची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली. गावातील शेकडो शिधापत्रिकाधारकांचे जबाब घेऊन चौकशीअंती रास्त भाव दुकानदार हे दोषी आढळले. त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे यांनी दिग्रस बु. येथील सदर रास्त भाव दुकानाच्या प्राधिकारपत्राची जमा असलेली १०० टक्के अनामत रक्कम शासनजमा करण्याचेही आदेशित केले. सदर रास्त भाव दुकानदाराने शिधापत्रिकाधारकांना कमी वाटप केल्याचे आढळलेल्या २१.९१ क्विंटल गहू , १५.०७ क्विंटल तांदूळ, २५ किलो ४०० ग्रॅम साखर या मालाच्या बाजारभावाने होणाऱ्या किमतीच्या फरकाची एक लाख एक हजार ९३० रुपयांची रक्कम सदर रास्त भाव दुकानदाराकडून वसूल करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे व रास्त भाव दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द करण्यात येत असल्याचा आदेश दिला आहे. तसेच दिग्रस खुर्द येथील शिधापत्रिकाधारकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सदर दुकान नजीकच्या दुकानास जोडण्याचाही आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी टाकसाळे यांनी पातूरच्या तहसीलदारांना दिला आहे.