शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत कर्मचा-यांबाबत कॅनरा बँक वरिष्ठांचे कानावर हात!

By admin | Updated: March 9, 2017 03:41 IST

प्रादेशिक कार्यालय, व्यवस्थापकांकडे दाखविले बोट

सदानंद सिरसाट अकोला, दि. ८- बँकेच्या नवीन नियमानुसार, डिसेंबर २0१४ नंतर कॅनरा बँकेच्या कोणत्याही शाखेत अनधिकृत व्यक्तींना शिपाई-मदतनीस पदावर ठेवणार नाही, असे घोषणापत्र दिल्यानंतरही राज्यात शेकडो अनधिकृत कर्मचार्‍यांकडूनच ही कामे करून घेण्यात येत आहेत. त्यातच आता नियम आणि भरती प्रक्रियेचे निकष डावलत त्याच अनधिकृत व्यक्तींना कायम केले जात आहे. या प्रकाराबाबत बंगळुरू येथील मुख्यालयाने कानावर हात ठेवले. महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालय आणि बँक व्यवस्थापकांनाच त्याबाबत विचारण्याचे सांगण्यात आले, तर हा प्रकार मुख्य कार्यालयालाच विचारा,असे प्रादेशिक कार्यालयाने सांगितल्याने या भरती प्रकरणात संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.कॅनरा बँकेत सुरक्षेचा मुद्दा वार्‍यावर सोडत बँकेच्या शेकडो शाखांमध्ये अधिकारी-कर्मचार्‍यांच्या नातेवाइकांनाच शिपाई-मदतनीस म्हणून कामावर ठेवले जाते. एक-दोन वर्षातच त्याला नोकरीत कायम करण्याचा प्रस्ताव सादर करून त्याला मान्यता प्राप्त करून घेतली जाते. त्यामध्ये नातेवाइकांची लॉटरी तर लागतेच शिवाय संबंधित अधिकारी-कर्मचार्‍यालाही चांगलाच आर्थिक लाभ पदरात पडतो. हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्याला प्रतिबंध घालण्यासाठी बँकेच्या मुख्यालयाने ४ डिसेंबर २0१४ रोजी निर्देश दिले. त्या निर्देशासोबतच यापुढे बँकेच्या शाखेत अनधिकृत व्यक्तीला कामावर ठेवले जाणार नाही. बँकेत तसे कर्मचारी आढळल्यास बँक व्यवस्थापकाला जबाबदार धरून कारवाई केली जाईल, असे घोषणापत्रही व्यवस्थापकांकडून घेण्यात आले. त्यानंतरही बँकेच्या नवीन शाखांमध्ये शेकडो कर्मचारी अनधिकृत आहेत. अनधिकृत व्यक्तींची नियुक्ती निश्‍चितकॅनरा बँकेच्या अनेक शाखांमध्ये नागपूर येथून नवृत्त झालेल्या एका अधिकार्‍याने अमरावती विभागात मोठय़ा प्रमाणात अनधिकृत व्यक्तींना नियुक्ती देण्यासाठी व्यवहार केल्याची माहिती आहे. त्यातूनच मूर्तिजापूर, माना, दर्यापूर यांसह अनेक शाखांमध्ये त्या व्यक्तीशी लागेबांधे असलेल्यांची नियुक्ती निश्‍चित झाली आहे. लोकप्रतिनिधींच्या मागणीला बगलकॅनरा बँकेत नवीन प्रक्रियेनुसारच भरती करावी, या मागणीचे पत्र खासदार नाना पटोले, माजी आमदार हरिदास भदे यांनी बँक व्यवस्थापनाला दिले होते. त्यावर केंद्रिय वित्तमंत्री कार्यालयातून त्या पद्धतीनेच भरती केली जाईल, असेही सांगण्यात आले; मात्र कॅनरा बँकेच्या नव्या फतव्याने खासदार, आमदारांची मागणी आणि बँक व्यवस्थापनाचे आधीचे निर्देश धुडकावण्याचा प्रकार घडण्याची शक्यता आहे.मुख्य कार्यालयाने या भरतीबाबत कोणतेही निर्देश महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयात दिले नाहीत. हा विषय त्यांच्या स्तरावर असू शकतो. याबाबतची अधिक माहिती पुणे येथील प्रादेशिक कार्यालयालाच विचारा. - अनिलकुमार पी. उपमहाप्रबंधक, सीईओ सचिवालय, कॅनरा बँक. बंगळुरूभरती प्रक्रिया मुख्य कार्यालयातून केली जाते. त्यांच्या निर्देशानुसार ती पार पडते. सेवायोजन कार्यालयातील नोंदणीकृत उमेदवारांशिवाय ती करता येते. २0१४ च्या निर्देशानंतर कुठे अनधिकृत व्यक्ती असल्यास माहिती द्यावी, नव्या पाच शाखांमध्ये नियमानुसार भरती केली जाईल. - श्री. स्वेन, प्रादेशिक कार्यालय, कॅनरा बँक, पुणे.