शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

कॅनरा बँक तक्रारींची चौकशी करणार!

By admin | Updated: March 13, 2017 02:41 IST

चतुर्थश्रेणी कर्मचारी भरती आणि इतरही तक्रारींची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयातील अधिकारी.

अकोला, दि. १२- कॅनरा बँकेतील चतुर्थश्रेणी कर्मचारी भरती आणि इतरही तक्रारींची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयातील अधिकारी श्री. स्वेन यांनी दर्यापूर येथील तक्रारक र्त्याला कळविले आहे. त्यामुळे आता या भरतीच्या नावावर मलिदा लाटत नातेवाइकांचा भरणा करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. नवीन नियमानुसार, डिसेंबर २0१४ नंतर कॅनरा बँकेच्या कोणत्याही शाखेत अनधिकृत व्यक्तींना शिपाई-मदतनीस पदावर ठेवता येत नाही. त्यासाठी बँकेच्या मुख्य कार्यालयाने सर्वच बँक व्यवस्थापकांकडून तसे घोषणापत्र लिहून घेतलेले आहे. त्यानंतरही राज्यात शेकडो अनधिकृत कर्मचार्‍यांकडूनच ही कामे करून घेण्यात येत आहेत. त्यातच नियम आणि भरती प्रक्रियेचे निकष डावलत त्याच अनधिकृत व्यक्तींना कायम करण्याची तयारीही सुरू आहे. ही बाब ह्यलोकमतह्णने वृत्त लावून धरली. सोबतच दर्यापूर येथील तक्रारकर्त्यांनी कात्रणासह बँक व्यवस्थापनाकडे तक्रारी केल्या. बँकेच्या नवीन शाखांमध्ये शेकडो कर्मचारी अनधिकृत आहेत. आता त्यांनाच कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्याची तयारी झाली आहे. बँकेच्या एका संघटना पदाधिकार्‍यांनी त्यासाठी चांगलीच फिल्डिंग लावली आहे. त्यावर बँकेच्या पुणे येथील राज्याच्या मुख्य कार्यालयाचे अधिकारी श्री. स्वेन यांनी या प्रकाराची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे तक्रारकर्त्यांना कळविले. माना, मूर्तिजापुरात एकाच आडनावाचे कर्मचारीकॅनरा बँकेत चतुर्थश्रेणी पदभरतीमध्ये बँकेच्या नागपूर येथून नवृत्त झालेल्या एका अधिकार्‍याची मक्तेदारी आहे. अमरावती विभागात मोठय़ा प्रमाणात अनधिकृत व्यक्तींना नियुक्ती देण्यासाठी व्यवहार करण्यात आलेला आहे. याबाबतची खातरजमा केल्यास बँकेच्या मूर्तिजापूर आणि माना शाखेत एकाच आडनावाचे शिपाई-मदतनीस पदावर असल्याची माहिती आहे. त्यांनाही नोकरीत कायम करण्यासाठी माहिती सादर करण्यात आली आहे.