शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कॅनॉल रोडच्या हस्तांतरणासाठी मुहूर्त सापडेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 14:09 IST

शेतकºयांना सिंचनासाठी उपलब्ध करून दिलेल्या कॅनॉलचे अस्तित्व कधीचेच संपुष्टात आले आहे. कॅनॉलच्या दोन्ही बाजूने आता रहिवासी वस्ती आहे. सुमारे १०० फुट रूंदीच्या कॅनॉलच्या जागेवर स्थानिकांनी दोन्ही बाजूने अतिक्रमण केले आहे. अतिक्रमणाची समस्या पाहता पाटबंधारे विभाग तसेच जिल्हाप्रशासनाने ही जागा मनपाकडे तातडीने हस्तांतरित क रण्याची गरज आहे.

ठळक मुद्देमनपा ‘वेटिंग’वर;जिल्हाधिकाºयांच्या भूमिकेकडे लक्ष

आशिष गावंडे/ अकोलाजुने शहरातील डाबकी रोड ते बाळापूर रोडपर्यंतच्या कॅनॉल रस्त्याची दुर्दशा झाली आहे. पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेल्या कॅनॉलची जागा रस्त्यासाठी हस्तांतरित करण्याचे जिल्हाधिकारी आस्तीककुमार पांडेय यांना अधिकार आहेत. मागील दोन वर्षांपासून ही जागा मिळवण्यासाठी महापालिका प्रशासनाची धडपड सुरु असली तरी अद्यापही जिल्हाप्रशासनाने जागेच्या हस्तांतरणाचा निर्णय घेतला नाही. नगर विकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी कॅनॉल रस्त्यासाठी ६ कोटींची तरतूद केली असताना जिल्हाप्रशासन व महापालिकेला कॅनॉलच्या हस्तांतरणासाठी मुहूर्त सापडत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघातील सर्वाधिक दाट लोकवस्तीचा भाग म्हणून जुने शहराकडे पाहिल्या जाते. जुने शहरात डाबकी रोड, जुना बाळापूर रोड व हरिहरपेठ मार्गाचा प्रमुख रस्ते म्हणून वापर होतो. सर्वाधिक वर्दळ डाबकी रोडवर राहत असून अरुंद रस्त्यामुळे वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार दैनंदिन झाले आहेत. जुने शहरातील वाहतूक वळवण्यासाठी कॅनॉल रस्त्याचा एकमेव पर्याय आहे. डाबकी रोड ते जुना बाळापूर रोडपर्यंत १ हजार ३०० मीटर अंतराच्या कॅनॉल रस्त्यासाठी मनपाचे तत्कालीन आयुक्त दिपक चौधरी यांच्या कालावधीत निविदा प्रकाशित करण्यात आली होती. त्यावेळी प्रशासनाने १ कोटी ६० लक्ष रुपयांची तरतूद केली होती. पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेल्या कॅनॉलची जागा रस्ते विकासासाठी मनपाकडे हस्तांतरित होणे गरजेचे होते. यासंदर्भात मनपा प्रशासनाने पाटबंधारे विभाग आणि जिल्हाधिकाºयांकडे वारंवार पाठपुरावा केला. कॅनॉल रस्त्याची जागा मनपाकडे हस्तांतरित करण्याचे जिल्हाधिकाºयांना सर्वाधिकार आहेत. जुने शहरातील वाहतुकीची समस्या ध्यानात घेता याविषयी जिल्हाप्रशासनाने तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे.६ कोटींची तरतूद केली पण...जुने शहरातील अरूंद रस्ते,वाहतुकीची कोंडी पाहता नगर विकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी वर्षभरापूर्वी डाबकी रोड ते जुना बाळापूर रोड ते थेट राष्ट्रीय महामार्गावरील नवीन किराणा मार्केटपर्यंत रस्ता तयार करण्यासाठी ६ कोटी रुपयांची तरतूद केली. पालकमंत्र्यांनी निधीची तरतूद केल्यावरही जिल्हाप्रशासन व मनपा प्रशासनाकडून रस्ते हस्तांतरणाच्या प्रक्रियेला विलंब होतोच कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासकीय यंत्रणांचा लेटलतीफ कारभार पाहता ६ कोटींचा निधी इतरत्र वळती करण्याच्या हालचाली सुरु झाल्याची माहिती आहे.                                                                                                                                                                                                                                            कॅनॉल अस्तित्वात नाही,तरीही विलंब!शेतकºयांना सिंचनासाठी उपलब्ध करून दिलेल्या कॅनॉलचे अस्तित्व कधीचेच संपुष्टात आले आहे. कॅनॉलच्या दोन्ही बाजूने आता रहिवासी वस्ती आहे. सुमारे १०० फुट रूंदीच्या कॅनॉलच्या जागेवर स्थानिकांनी दोन्ही बाजूने अतिक्रमण केले आहे. अतिक्रमणाची समस्या पाहता पाटबंधारे विभाग तसेच जिल्हाप्रशासनाने ही जागा मनपाकडे तातडीने हस्तांतरित क रण्याची गरज आहे.