शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

वीज ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी जिल्हाभरात मेळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 17:35 IST

महावितरण अकोला ग्रामीण विभागाच्या वतीने २५ जुलैपासून तीन दिवस अकोला ग्रामीण, मुर्तीजापूर, बाळापूर, बार्शीटाकळी आणि पातूर येथे उपविभागनिहाय ग्राहक सुसंवाद व तक्रार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

अकोला : महावितरणअकोला शहर विभागानंतर आता ग्रामीण विभागातील वीज ग्राहकांच्या तक्रारांची दखल घेण्यासाठी महावितरण अकोला ग्रामीण विभागाच्या वतीने २५ जुलैपासून तीन दिवस अकोला ग्रामीण, मुर्तीजापूर, बाळापूर, बार्शीटाकळी आणि पातूर येथे उपविभागनिहाय ग्राहक सुसंवाद व तक्रार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये यांच्या निर्देशानुसार अकोला परिमंडळातील अकोला , बुलढाणा व वाशिम जिल्हयात महावितरण ग्राहकांच्या वीज सेवेबाबत असलेल्या विविध तक्रारीचे निवारण करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.अकोला ग्रामीण विभागातील अकोला ग्रामीण व बाळापुर उपविभागात दिनांक २५ जुलै रोजी, मुर्तीजापूर व बार्शिटाकळी उपविभागात २६ जुलै रोजी, तर पातूर उपविभागात २७ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी १:३० या कालावधीत संबधित उपविभागाच्या कार्यालयीन परिसरातच हे मेळावे पार पडणार आहेत. या मेळाव्यात विविध वर्गवारीतील ग्राहकांची वीज बिल दुरूस्ती , नविन वीज जोडणी , वाढीव भार , नावामधिल बदल दुरूस्ती , मोबाईल क्रमांक नोंदणी इत्यादी तक्रारींची दखल घेण्यात येणार आहे. शिवाय महावितरण वॉलेट पेमेंट व इतर सुविधाबाबतही यावेळी ग्राहकांना माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे अकोला ग्रामीण भागातील अकोला ग्रामीण ,बाळापूर , मुतीर्जापूर ,बाशीर्टाकळी , आणि पातूर या उपविभागातील महावितरणच्या ग्राहकांनी त्यांच्या तक्रारी संदभार्तील कागदपत्रे व वीज देयके सोबत आणावे असेही आवाहन महावितरण अकोला ग्रामीण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाmahavitaranमहावितरण