शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईहून दुचाकीने आले अकोल्यात; मुलगा निघाला पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 09:29 IST

मुंबई येथून दुचाकीने अकोला शहर गाठलेल्या ‘त्या’ कुटुंबातील मुलगा पॉझिटिव्ह निघाल्याची बाब मंगळवारी अहवालाद्वारे उघडकीस आली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना विषाणूची साखळी खंडित व्हावी या उद्देशातून केंद्र व राज्य सरकारने टाळेबंदी जाहीर केली. त्या अनुषंगाने पोलिसांनी ठिकठिकाणी लावलेल्या नाकाबंदीचा ससेमिरा चुकवत चक्क मुंबई येथून दुचाकीने अकोला शहर गाठलेल्या ‘त्या’ कुटुंबातील मुलगा पॉझिटिव्ह निघाल्याची बाब मंगळवारी अहवालाद्वारे उघडकीस आली. त्यामुळे माहेरी आलेल्या मुलीवर जावयासह सासरकडील एकूण १२ लोकांवर घशातील स्त्रावाचे नमुने देण्याचा प्रसंग ओढवला आहे. दरम्यान, या प्रकारामुळे पुन्हा एकदा पोलिसांच्या नाकाबंदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे भीतीपोटी तसेच हातातील रोजगार हिरावून गेल्याच्या चिंतेने बाहेरगावी गेलेले नागरिक शहरामध्ये परत येत आहेत. मुंबई येथे काम करणाऱ्या पाच जणांचे कुटुंबीय पोलिसांचा ससेमिरा चुकवित चक्क दोन दुचाकीने अकोला शहरात दाखल झाले. पश्चिम झोनमधील हद्दवाढ क्षेत्रातील भागात माहेरी आलेल्या या महिलेच्या ११ वर्षीय मुलाची अचानक प्रकृती बिघडली. त्याची लक्षणे पाहता मनपाने घशातील स्त्रावाचे नमुने घेऊन चाचणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयकडे पाठविले. मंगळवारी सदर मुलाचा अहवाल प्राप्त झाला असता त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर येताच कुटुंबीयांना धक्का बसला.ही बाब लक्षात घेता मनपाचे क्षेत्रीय अधिकारी राजेंद्र टापरे यांनी संबंधित कुटुंबीयांच्या घरी जाऊन त्यांना घशातील स्त्रावाचे नमुने देण्यासाठी भरतीया रुग्णालयात पाठविले. या रुग्णांचे नमुने घेण्यात आले असून, चाचणीसाठी सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

नाकाबंदी वादाच्या भोवºयातकेंद्र व राज्य शासनाने टाळेबंदी घोषित केल्यामुळे जिल्हा व पोलीस यंत्रणेची रीतसर परवानगी घेऊनच नागरिकांना जिल्ह्यात दाखल होता येते. दोन दुचाकीच्या मदतीने शहरात दाखल झालेल्या कुटुंबीयांमुळे पोलिसांची नाकाबंदी वादाच्या भोवºयात सापडली आहे. कोरोनाच्या प्रसाराला ही बाबही कारणीभूत ठरत आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला