शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

चलनातून बाद झालेल्या 20 लाखांच्या नोटा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 19:00 IST

चलनातून बाद झालेल्या एक हजार आणि पाचशे रुपयाच्या 20 लाख रुपयांच्या नोटा खोलेश्वर भागात जप्त करण्यात आल्या.

अकोला, दि. 30 - चलनातून बाद झालेल्या एक हजार आणि पाचशे रुपयाच्या 20 लाख रुपयांच्या नोटा खोलेश्वर भागात जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी राकेश अशोकराव तोहगावकर (२७) याला अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी ही कारवाई केली.दुचाकीवरुन (एमएच-३०-एके-२५६४)   एक व्यक्ती चलनातून बाद झालेल्या एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा घेऊन जात असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दुचाकीवर पाळत ठेवून पाठलाग केला. खोलेश्वर परिसरात या दुचाकीला अडविले. यावेळी दुचाकीस्वार राकेश तोहगावकर याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याजवळ असलेल्या  बॅगची झडती घेतली असता, त्यात हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा आढळल्या. यामध्ये एक हजाराच्या नोटांचे नऊ लाखांचे बंडल आणि पाचशेच्या नोटांचे ११ लाखांचे बंडल, असे एकूण २० लाख रुपये सापडले. पोलिसांनी ही रोकड जप्त करुन राकेशला अटक केली. सदर माहीती  आयकर विभाग नागपूरला देण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर आणि विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक कैलास नागरे, पोलीस उपनिरीक्षक योगेंद्र मोरे, एएसआय अशोक चाटी, नीलेश गोरे, अजय नागरे, शेख हसन, अ. मजिद, एजाज अहेमद, संदीप तवाडे यांनी  केली.नागपूरच्या रॅकेटशी संबंध?चलनातून बाद झालेल्या २० लाखांच्या या प्रकरणाचे धागेदोरे नागपूरस्थित रॅकेटशी असल्याचे समजते. जप्त करण्यात आलेल्या वीस लाखाच्या बदल्यात  एक टोळी चार लाख रुपये तर दुसरी टोळी याच नोटांच्या बदल्यात  बारा लाख देणार असल्याचे सुत्राचे म्हणने आहे. नागपूरशी जुळलेल्या या रॅकेटमध्ये अनेक मोठी नावे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.