शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कडबा पेंडीचे दर पोहोचले शेकडा पाच हजार रुपयांवर !

By admin | Updated: February 2, 2016 01:48 IST

विदर्भात चाराटंचाईचा पशुधनावर परिणाम; पशुपालक हवालदिल.

राजरत्न सिरसाट/अकोला: विदर्भात आतापासूनच चाराटंचाईचा प्रश्न निर्माण झाला असून, पशुधनासाठी आवश्यक असलेले कडबा पेंडीचे दर शेकडा पाच हजार रुपयांपर्यंंत पोहोचल्याने पशुपालक हवालदिल झाले आहेत. पशुधनाला लागणार्‍या हिरव्या चार्‍याची गरज भागविण्यासाठी पिंपळ, सुबाभूळ, कडुनिंबाचा चाराही विकत घेण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. गतवर्षी अल्प पाऊस झाल्याने खरीप हंगामातील जवळपास सर्वच पिकांचे उत्पादन कमी झाले असून, सोबतच चार्‍याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. पूर्वी ज्वारी, कापूूस हे या भागाचे मुख्य पीक होते. अलिकडच्या काही वर्षांंमध्ये या पिकांची जागा सोयाबीनने घेतल्याने विदर्भातील ही पारंपरिक पिके मागे पडली आहेत. त्यामुळे ज्वारीचे उत्पादन घटल्याने पशुधनासाठी पोषक आणि आवश्यक कडबा कमी झाला आहे. परिणामी कडब्याचे दर प्रचंड वाढले असून, एका कडबा पेंडीचा दर ५0 रुपयापर्यंंत पोहोचला आहे. या कडब्यापासून तयार होणार्‍या कुट्टीचा दर ८ ते १२ रुपये प्रतिकिलोपर्यंंत गेला आहे. भरीस भर, वजनात जास्त भरावी, यासाठी ही कुट्टी ओली करू न पशूपालकांना विकली जात आहे. यावर्षी कोरडवाहू क्षेत्रात तुरीचेही उत्पादन घटले आहे. त्यामुळे तुरीच्या कुटाराचे दर तीन ते पाच रुपये प्रतिकिलोपर्यंंत पोहोचले असून, सोयाबीनचे खाद्य (कुटार) जनावरे खात नसली, तरी या कुटाराचा दर तीन रुपये किलो झाला आहे. हरभर्‍याचे कुटार पाच ते सात रुपये किलो असून, सुबाभूळ, पिंपळ, कडुनिंबाचा पाला दोन ते चार रुपये किलोने विकला जात आहे. चार्‍याचे दर प्रचंड वाढल्याने शेतकर्‍यांना पशुधन ओझ्यासारखे वाटत असून, परिणामी वाटेल त्या दरात पशुधन विकण्यात येत आहेत. गव्हाचे कुटार (गव्हंडा) जनावरे खात नाहीत. तथापि, या गव्हंड्याचाही दर २५0 ते ३00 रुपये क्विंटलपर्यंंत पोहोचला आहे.