शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइलवर लिंक पाठवून महिलेला अडीच लाखाने घातला गंडा; पाेलिस ठाण्यात तक्रार

By आशीष गावंडे | Updated: April 3, 2024 22:19 IST

महिलेने अर्ज भरून दिल्यानंतर त्या महिलेच्या बँक खात्यामधून २ लाख ६४ हजार ४३९ रूपये ऑनलाइनद्वारे परस्पर काढण्यात आले

अकोला: क्रेडिट कार्ड अँक्टीव्ह करुन देण्याच्या नावाखाली एका महिलेच्या माेबाइलवर लिंक पाठवून एका भामट्याने २ लाख ६४ हजार रुपयाने गंडा घातल्याची घटना उजेडात आली आहे. याप्रकरणी २ एप्रिल रोजी फिर्यादीने खदान पाेलिस ठाण्यात तक्रार नाेंदवली असता, पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

गाेरक्षण राेडस्थित किर्ती नगरातील एका महिलेला अज्ञात आरोपीने तुमचे क्रेडिट कार्ड बंद झाले असून, ते पुन्हा सुरू करून देतो, असे सांगत महिलेच्या मोबाइल फोनवर एक लिंक पाठविली. तसेच महिलेला एक अर्ज भरायला सांगितला. त्यानुसार महिलेने अर्ज भरून दिल्यानंतर त्या महिलेच्या बँक खात्यामधून २ लाख ६४ हजार ४३९ रूपये ऑनलाइनद्वारे परस्पर काढण्यात आले. आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संजय शेळके (५९) रा. किर्ती नगर, गोरक्षण रोड यांनी दिलेल्या खदान पाेलिस ठाण्यात तक्रार दिली. प्राप्त तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ४२०, आयपीसी सहकलम ६६(डी), आयटीअ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास खदान पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक धनंजय सायरे करीत आहेत.