शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

सोयाबीनची सोमवारपासून हमीभावाने खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 02:04 IST

अकोला : बाजारातील सोयाबीनचे भाव पाहता येत्या सोमवारपासून सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. त्यासाठी जिल्ह्यात चार केंद्रावर सोय केली जात आहे, त्याठिकाणी मूग, उडिदासोबतच सोयाबीनची खरेदी प्रतिक्विंटल ३0५0 रुपये दराने होणार आहे.

ठळक मुद्देमूग, उडीद, सोयाबीन विक्रीसाठी नोंदणीचे आवाहनमूग, उडीद विक्रीसाठी ७८२ शेतकर्‍यांची नोंदणी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बाजारातील सोयाबीनचे भाव पाहता येत्या सोमवारपासून सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. त्यासाठी जिल्ह्यात चार केंद्रावर सोय केली जात आहे, त्याठिकाणी मूग, उडिदासोबतच सोयाबीनची खरेदी प्रतिक्विंटल ३0५0 रुपये दराने होणार आहे.  जिल्हय़ात अल्प पावसाचा तर इतरत्र अति पावसाचा फटका बसल्याने मूग, उडिदाचे पीक राज्यभरात नसल्यासारखेच आहे. त्यातही जे हातात आले, त्याची खरेदी मातीमोल भावाने करीत व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांना नागवणे सुरू केले. त्यावर उपाय म्हणून शासनाने हमीभावाने मूग, उडीद खरेदी ३ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे पणन विभागाला सांगितले. तालुका खरेदी-विक्री संस्थेकडून कृषी उत्पन्न बाजार समिती केंद्रात खरेदी सुरू झाली आहे. त्यासाठी एनईएमएल या संस्थेकडून नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, पावसामुळे धान्यातील ओलावा वाढण्याची शक्यता असल्याने खरेदीचा वेग मंदावला आहे. त्यातच आता सोयाबीनचे भावही प्रचंड घसरले. व्यापारी २000 ते २२00 रुपये प्रतिक्विंटल दराने शेतकर्‍यांकडून ते खरेदी करत आहेत. त्यातून शेतकर्‍यांना वेठीस धरले जात आहे. शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान थांबवण्यासाठी हमीभाव ३0५0 रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केले जाणार आहे.  खरेदी केंद्रावर नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांचे एफएक्यू दर्जाचे सोयाबीन, मूग, उडीद या धान्याची खरेदी केली जाईल. त्याची विक्री करण्यासाठी बाजार समितीच्या केंद्रात ऑनलाइन माहिती द्यावी लागणार आहे. त्यामध्ये जमिनीचा सात-बारा, आधार कार्ड, बँकेचे पासबुक घेतले जाईल. सात-बारामध्ये असलेली जमीन आणि त्यामध्ये असलेला पीक पेरा, या आधारे केंद्रात खरेदी केली जाईल. 

चार केंद्रांवर सोयसोयाबीन, मूग, उडीद खरेदीसाठी पणन महासंघाने जिल्हय़ातील अकोला, अकोट, मूर्तिजापूर, तेल्हारा या चार केंद्रांवर सोय केली आहे. त्या ठिकाणी खरेदी-विक्री संस्था आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. 

मूग, उडीद विक्रीसाठी ७८२ शेतकर्‍यांची नोंदणीहमीभावाने विक्री करण्यासाठी खरेदी केंद्रावर ऑनलाइन माहिती दाखल करणार्‍या शेतकर्‍यांची संख्या मंगळवारपर्यंत ७८२ झाली आहे. त्या शेतकर्‍यांना मूग, उडीद विक्रीसाठी ठरलेल्या दिवशी केंद्रावर आणण्यासाठी मेसेज दिला जाणार आहे. त्यामध्ये अकोला केंद्रात-३५७, अकोट-२३३, तेल्हारा-६२, मूर्तिजापूर-१३0 शेतकर्‍यांनी नोंदणी केली, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी बजरंग ढाकरे यांनी सांगितले. सोयाबीन विक्रीसाठी शेतकर्‍यांनी नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.