शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

८५0 क्विंटल कापूस खरेदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:47 IST

अकोला : राज्यात यंदा वीस दिवस आधीच शासकीय कापूस  खरेदीला सुरुवात करण्यात आली असून, महाराष्ट्र राज्य  सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने आतापर्यंत ८५0  िक्ंवटल कापसाची खरेदी केली आहे. मात्र येथे ओलावा व प्र तवारीचे निकष कडक करण्यात आल्याने व्यापार्‍यांनाच कापूस  विकण्याची पाळी शेतकर्‍यांवर आली आहे.

ठळक मुद्देराज्य पणन महासंघप्रतवारीचे निकष शेतकर्‍यांच्या मुळावर

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यात यंदा वीस दिवस आधीच शासकीय कापूस  खरेदीला सुरुवात करण्यात आली असून, महाराष्ट्र राज्य  सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने आतापर्यंत ८५0  िक्ंवटल कापसाची खरेदी केली आहे. मात्र येथे ओलावा व प्र तवारीचे निकष कडक करण्यात आल्याने व्यापार्‍यांनाच कापूस  विकण्याची पाळी शेतकर्‍यांवर आली आहे. दरम्यान, खासगी  बाजारात जिल्हानिहाय कापसाचे दर बदलत असून, अनेक  ठिकाणी चार हजार रुपये प्रतिक्विंटलने कापसाची खरेदी केली  जात असल्याचे वृत्त आहे.राज्यात दरवर्षी १५ नोव्हेंबरनंतर शासकीय कापूस खरेदी केंद्र  सुरू  केली जातात. यावर्षी वीस दिवस आधीच ५९ केंद्रांवर  खरेदी सुरू  करण्यात आली आहे. मात्र आठ टक्केच ओलावा व  सर्वसाधारण प्रतीच्या (एफएक्यूू) कापसाचे निकष लावण्यात  आल्याने शेतकर्‍यांना व्यापार्‍यांनाच कापूस विकावा लागत  आहे. केंद्र शासनाने यावर्षी ४,३२0 रुपये कापसाचे हमीदर  जाहीर केले आहेत;  पण निकषाच्या शर्यतीत कापूस उत्पादक  मागे पडल्याचे चित्र आहे.राज्यात खासगी बाजारात ठिकठिकाणी  वेगवेगळे दर आहेत. जळगाव खान्देश भागात ४,000 ते  ४,७00 रुपये क्विंटल, तर विदर्भात हेच दर चार हजार रुपये  आहेत. दरम्यान, रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी शे तकर्‍यांना पैशांची नितांत गरज आहे. त्यामुळे त्यांना मिळेल्या त्या  किमतीला कापूस विकण्यावाचून पर्याय राहिलेला नाही. त्यातच  सोयाबीनलाही प्रतवारीचे निकष लावले जात असल्याने  सोयाबीनही अल्पदरात विकण्याची पाळी शेतकर्‍यांवर आली  आहे.

सध्या कापसात ओलावा आहे. नियमित कापसाची आवक १५  नोव्हेंबरनंतरच होते, तेव्हा कापसाला चांगले दर मिळतील.- जे. पी. महाजन, विभागीय अधिकारी

टॅग्स :agricultureशेती