शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

परवान्याशिवाय व्यवसाय; महापालिकेने लावले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 14:49 IST

मनपाचा बाजार विभाग, अतिक्रमण विभागाने गांधी रोड ते ताजनापेठ पोलीस स्टेशनपर्यंतच्या दुकानांची तपासणी केली असता, अनेकांकडे विसंगती आढळून आली.

अकोला : महापालिका प्रशासनाने दिलेल्या परवान्याचे नूतनीकरण न करताच व्यवसाय करणाऱ्या गांधी रोड, ताजनापेठ भागातील व्यावसायिकांच्या दुकानांना सील लावण्याची कारवाई सोमवारी बाजार विभाग व अतिक्रमण विभागाने केली. या कारवाईमुळे विनापरवाना व्यवसाय करणाºया व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.शहरात कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी महापालिकेच्या बाजार विभागाकडून रीतसर परवाना घेणे अत्यावश्यक आहे. या बदल्यात प्रशासनाला शुल्कापोटी महसूल प्राप्त होतो. दरवर्षी दुकानांचा परवाना आणि व्यवसाय परवान्याचे नूतनीकरण करणे क्रमप्राप्त आहे. काही व्यावसायिक परवाना न घेताच शहरात व्यवसाय करीत असल्याची मनपाला कुणकुण लागली होती. तसेच ज्या व्यावसायिकांकडे परवाना आहेत, त्यांनी नूतनीकरण केले नसल्याची बाजार विभागाकडे माहिती होती. या दोन्ही बाबी लक्षात घेता सोमवारी मनपाचा बाजार विभाग, अतिक्रमण विभागाने गांधी रोड ते ताजनापेठ पोलीस स्टेशनपर्यंतच्या दुकानांची तपासणी केली असता, अनेकांकडे विसंगती आढळून आली. यामध्ये ईश्वरदास अ‍ॅण्ड सन्स ज्वेलर्स, मिस इंडिया एन.एक्स., यशवंत अ‍ॅकेडमी प्रा.लि., ब्युटी प्लस दर्याव हाईट्स यांचे परवाने नूतनीकरण केले नसल्याचे आढळून आले. याप्रकरणी संबंधितांना प्रत्येकी ५ हजार रुपये दंड आकारण्यात आला. सदर कारवाई अतिक्रमण विभाग प्रमुख अनिल बिडवे, बाजार अधीक्षक संजय खराटे, अतिक्रमण विभागाचे प्रवीण मिश्रा, विठ्ठल देवकते, चंद्रशेखर इंगळे, मूलसिंह चव्हाण तसेच कर्मचाऱ्यांनी केली.कारवाईत तफावत का?परवान्याचे नूतनीकरण न केलेल्या व्यावसायिकांना ५ हजार रुपयांचा दंंड आकारणाºया प्रशासनाने गांधी चौकातील व्यावसायिकांच्या दुकानांना सील लावण्याची कारवाई केली. यामध्ये अमन कटलरी, विराणिया ब्रदर्स, मधुसूदन क्रॉकरी, गृह उद्योग, न्यू शिव सुपारी ट्रेडर्स, बदुरुद्दीन मोहम्मद अली हार्डवेअर, आन फुटवेअर, बालकृष्ण टाइम सेंटर, शिबाम ट्रेडर्स, ईस्माईलजी अ‍ॅण्ड कं., साईबा अमृततुल्य चहा सेंटर आदी दुकान व्यावसायिकांचा समावेश आहे. प्रशासनाच्या कारवाईत तफावत का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका