अकोला - अकोल्यावरून पातूरकडे जात असलेल्या एका दुचाकीस्वारास समोरून येणार्या भरधाव एसटीने चिरडल्याची घटना रविवारी दुपारी हिंगणा फाट्यानजीक घडली. या अपघातात पातूर येथील रहिवासी रामेश्वर विजय राठोड यांचा जागेवरच मृत्यू झाला. पातूर येथील रामेश्वर राठोड हे आपल्या एम एच ३0 एच ८१८६ क्रमांकाच्या दुचाकीने पातूरकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला समोरुन येणार्या एम एच ४0 एन ८२२७ क्रमांकाच्या भरधाव एसटीने जबर धडक दिली. या अपघातात रामेश्वर राठोड यांचा जागेवरच मृत्यू झाला. या अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी राठोड यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणले; मात्र डॉक्टरांनी राठोडला मृत घोषित केले. या प्रकरणी राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकार्यांनी जुने शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.
बसची दुचाकीस धडक; एक ठार
By admin | Updated: February 23, 2015 01:53 IST