शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

बाळापुरात ट्रकच्या धक्क्याने बसचे नुकसान

By admin | Updated: August 29, 2016 01:28 IST

बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे भीषण अपघात टळला.

बाळापूर (जि.अकोला), दि. २८: बाळापूर येथील मन नदीवरील पुलावरून २९ ऑगस्ट रोजी सकाळी जाणार्‍या एका एस.टी. बसला विरुद्ध दिशेने राँग साइडने येणार्‍या ट्रकने धडक दिल्याने बसचे तीन हजार रुपयांचे नुकसान झाले. या अपघाताबाबत सदर बसचालकाने दाखल केलेल्या तक्रारीवरून ट्रकचालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या धडकीमुळे बस पुलावरून खाली कोसळून भीषण अपघात झाला असता; परंतु प्रवाशांच्या सुदैवाने व बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे तो टळला.मलकापूर येथून अमरावतीकडे जाणार्‍या एम.एच.४0 वाय ५४८१ क्रमांकाची एस.टी. बस रविवारी सकाळी मन नदीवरील पुलावरून जात असताना त्याचवेळी विरुद्ध दिशेने राँग साइडने येणार्‍या एम.एच.२८ बी.८३२५ क्रमांकाच्या ट्रकने तिला जोरदार धडक दिली. त्यामुळे बसचालकाच्या बाजूच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या व बसचे तीन हजार रुपयांचे नुकसान झाले. या अपघाताबाबत बसचालक उमेश अशोक पवार यांनी बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीवरून बाळापूर पोलिसांनी सदर ट्रकचालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. येथील मन नदीवर एक जुना व एक नवा असे दोन पूल आहेत. परंतु, तरीही रॉंग साइडने वाहने चालविण्याचे प्रकार सुरूच आहेत.