ऑनलाइन लोकमत
बाळापूर, दि. ४ - एसटी बसने ट्रकला धडक दिल्याची घटना सोमवारी पहाटे अकोला जिल्ह्यातील रिधोरानजीक घडली. या अपघातात बस वाहक रविंदरसिह उमेदसिह किल्लेदार ( वय 40 रा मलकापूर, जिल्हा अकोला) हे ठार झाले , असून 10 प्रवासी जखमी झाले. एम एच 14 5022 या पुणे-नागपूर बसने जीजे 25-यू-3341 या क्रमांकाच्या ट्रकला धडक दिली. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत