शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

बसची ट्रकला धडक; ३२ प्रवाशी जखमी

By admin | Updated: January 29, 2015 00:44 IST

राष्ट्रीय महामार्ग सहा वरील दाळंबीजवळची घटना.

मूर्तिजापूर/बोरगाव मंजु (जि. अकोला): भरधाव बसने ट्रकला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात बसमधील ३२ प्रवाशी किरकोळ जखमी झाले. ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर दाळंबी गावाच्या वळणावर बुधवार, २८ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली. जखमींना अकोला येथील सवरेपचार व मूर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.प्राप्त माहितीनुसार, चिखली आगाराची एम.एच. २0 बी.एल. १९३0 क्रमांकाची बस नागपूर येथून परतीच्या प्रवासाला चिखलीकडे जात होती. मूर्तिजापूर येथून निघाल्यानंतर सकाळच्या सुमारास दाळंबी गावानजीकच्या वळणावर समोरच्या ट्रकचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने सदर बस ट्रकवर आदळली. बसची धडक लागल्यानंतर ट्रकचालक तेथून सुसाट वेगाने पसार झाला. या अपघातात बसमधील ३२ प्रवासी जखमी झाले. यापैकी ३0 जणांना किरकोळ स्वरुपाच्या इजा झाल्या. तर अमरावती येथील प्रवीण गायधने व मूर्तिजापूर येथील विमल भटकर यांना जास्त मार लागला. जखमी प्रवाशांना उपचारार्थ अकोला येथील सवरेपचार रुग्णालयात पाठविण्यात आले, तर तीन प्रवाशांना मूर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातात बसच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले. आमदार हरीश पिंपळे यांनी जखमींना उपचारासाठी पाठविण्यास मदत केली. यावेळी महामंडळाच्यावतीने वाहतूक नियंत्रक एस.आर. घुरडे, आगार सचिव विजय साबळे, संतोष घोगरे, सचिन सरोदे यांनी जखमींना एक हजार रुपयांची मदत दिली. पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस करीत आहेत.