शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

कडेकोट नाकाबंदीतही घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:24 IST

अकोला : सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गजाननपेठमधील एसबीआय कॉलनीमधील रहिवासी डॉ. भारती श्याम हिवरकर या सवरेपचार रुग्णालयामध्ये ड्युटीवर असताना त्यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करीत रोख रकमेसह लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. चोर्‍यांचे सत्र सुरूच असताना कडेकोट नाकाबंदी पोलिसांनी केली; मात्र या नाकाबंदीमध्येही मोठी चोरी झाली.

ठळक मुद्देसिव्हिल लाइन्स व खदानमध्ये चोरी‘एसपीं’नी केली पोलीस अधिकार्‍यांची कानउघाडणी!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गजाननपेठमधील एसबीआय कॉलनीमधील रहिवासी डॉ. भारती श्याम हिवरकर या सवरेपचार रुग्णालयामध्ये ड्युटीवर असताना त्यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करीत रोख रकमेसह लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. चोर्‍यांचे सत्र सुरूच असताना कडेकोट नाकाबंदी पोलिसांनी केली; मात्र या नाकाबंदीमध्येही मोठी चोरी झाली.डॉ. भारती हिवरकर यांच्या घरामध्ये अज्ञात चोरट्यांनी सोमवारी दुपारी प्रवेश करून कपाटातील लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. यामध्ये ३५ हजार रुपये रोख आणि ३१ हजार रुपयांचे दागिने व अन्य साहित्य चोरट्यांनी पळविले. भरदुपारी घडलेल्या चोरीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, तर खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गोरक्षण रोडवरील गोदावरी अपार्टमेंट, विजय हाऊसिंग सोसायटीतील रहिवासी नवल रामगोपाल चितलांगे (४५) यांच्या घरातील कपाटातून नगदी ३२ हजार ५00 रुपये व सहा हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, असा एकूण ३८ हजार ५00 रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला.

‘एसपीं’नी केली पोलीस अधिकार्‍यांची कानउघाडणी!लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरात चोरट्यांनी प्रचंड हैदोस घालीत १७ दिवसांत १५ घरफोड्या केल्या असून, पोलिसिंगचा बट्टय़ाबोळ झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी पोलीस अधिकार्‍यांची सोमवारी तातडीने बैठक घेऊन कानउघाडणी केल्याची माहिती आहे. त्यानंतर लगेच तीन तास नाकाबंदी लावण्यात आली. पोलीस अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर उतरले; मात्र त्यानंतरही भरदिवसा दोन घरफोड्या झाल्याच.जिल्हय़ाची कायदा व सुव्यवस्था गत काही महिन्यांपासून प्रचंड बिघडली आहे. गुन्हेगारांवरील पोलिसांचे नियंत्रण सुटले असून, विद्यार्थिनीची छेडखानी, हुक्का पार्लर, चिमुकलीची हत्या, गुटखा माफियांचा हैदोस, जुगार अड्डे, क्लब, खुलेआम सुरू झाले आहेत. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष असून, याच अवैध धंद्यामधून प्रचंड वाद वाढत आहेत. तीन वर्षांपासून शांत असलेल्या भांडपुर्‍यातही दंगल झाली असून, याची दखल गुप्तचर यंत्रणेने घेतली आहे. त्यामुळे अकोला पोलिसांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चोर्‍यांचे सत्र सुरूच आहे, मात्र तरीही पोलिसांना त्याचे घेणे-देणे नसल्याचेच दिसून येत आहे. खंडण्या व गुंडगिरी प्रचंड वाढली असताना पोलीस त्यांच्यावर कारवाई करण्यास पुढाकार घेत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

लोकमतने वेधले होते लक्ष ‘लोकमत’ने सोमवारीच १७ दिवसांत १५ चोर्‍या झाल्याचे प्रकाशित करून अकोला पेालिसिंगचा बट्टय़ाबोळ झाल्याचे वास्तव चित्र समोर आणले. त्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी पोलीस अधिकार्‍यांची तातडीने बैठक घेऊन नाकाबंदी लावली; मात्र या तीन तासांच्या नाकाबंदीतही भरदिवसा दोन घरफोड्या झाल्याने पोलिसांवर आता गुन्हेगार वरचढ झाल्याचे दिसून येत आहे.