शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

खंडाळ्यात पुन्हा घरफोडी

By admin | Updated: May 6, 2014 22:18 IST

हिवरखेड पोलिस स्टेशनअंतर्गत खंडाळा येथे चोर्‍यांचे सत्र सुरूच असून, अज्ञात चोरट्यांनी सोमवारी रात्री एका घरात प्रवेश करून २० हजारांचा ऐवज लंपास केला.

२० हजारांचा ऐवज लंपासखंडाळा : हिवरखेड पोलिस स्टेशनअंतर्गत खंडाळा येथे चोर्‍यांचे सत्र सुरूच असून, अज्ञात चोरट्यांनी सोमवारी रात्री एका घरात प्रवेश करून २० हजारांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी हिवरखेड पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिस सूत्रानुसार, अज्ञात चोरट्यांनी सोमवारी रात्री खंडाळा येथील संतोष भेंडे यांच्या घरात प्रवेश केला. कपाट फोडून रोख २० हजार रुपये लंपास केले. दरम्यान, चोरट्यांनी भेंडे यांच्या घरी शेवयावरही ताव मारल्याची माहिती भेंडे यांनी दिली. खंडाळा गावात एका महिन्यामध्ये पाच ते सहा ठिकाणी घरफोड्या करून लाखोंचा ऐवज लंपास केला. या प्रकारामुळे गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस प्रशासनाचा वचक राहिला नसल्यामुळे चोरट्यांची हिंमत वाढल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त केल्या जात आहेत. (वार्ताहर)ग्राम सुरक्षा दलाची स्थापनाखंडाळा : स्थानिक खंडाळा येथे झालेल्या चोर्‍यांची दखल घेत हिवरखेड पोलिसांनी गावातील नागरिकांची सभा घेऊन यामध्ये ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली. यामध्ये प्रत्येक रात्री ४ सुरक्षा रक्षक व एक पोलिस कर्मचारी यांनी गावामध्ये गस्त घालून गाव संरक्षण करावे. या कार्यक्रमाला सरपंच सुरेश जाधव, माजी सरपंच बलवंत सांगुनवेढे, गणपत सांगुनवेढे, ग्रा. पं. सदस्य दिनेश खंडेराव, मनोहर किनेकर, डॉ. वर्मा, प्रकाश खंडेराव, ठाणेदार अनंत पूर्णपात्रे, पोउनि. सूर्यवंशी, बिट जमादार दादाराव लिखार, हेकाँ. नागोराव भांगे, देशमुख व नागरिक उपस्थित होते.