शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामाच्या तोंडावर बैल बाजार बंद; शेतकरी हैराण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:29 IST

रवी दामोदर अकोलाः खरीप हंगाम तोंडावर आला असून, मशागतीच्या कामांना वेग आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे गुरांचे बाजार बंद ...

रवी दामोदर

अकोलाः खरीप हंगाम तोंडावर आला असून, मशागतीच्या कामांना वेग आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे गुरांचे बाजार बंद असल्याने शेतकऱ्याच्या ‘सर्जा-राजा’ची खरेदी-विक्री बंद आहे. परिणामी बैलाद्वारे केली जाणारी मशागतीची कामे अडचणीत आली आहेत. तसेच लॉकडाऊनमुळे बैलांचे भाव दुपटीने वाढल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

खरीप हंगाम तोंडावर आला असून, शेतात मशागतीची कामे सुरू आहेत. सद्यस्थितीत ट्रॅक्टरद्वारे नांगरणीच्या कामांना वेग आला आहे. दरम्यान, वाढत्या महागाईमुळे शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करण्यावर भर देत असल्याचे दिसून येत आहे. डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टर मालकांनी मशागतीचे दर वाढविले आहेत. त्यामुळे शेतकरी बैलांच्या साहाय्याने मशागतीची कामे करीत असल्याचे चित्र आहे. एप्रिल व मे महिन्यात बैल जोड्या खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैल बाजार बंद असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. मशागतीसाठी बैलांची आवश्‍यकता असल्याने काही शेतकरी बाजार बंद असल्याने वैयक्तिक स्तरावर बैलांचा शोध घेत आहेत. त्यामुळे बैलांचे दरही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे खरीप हंगामाची कामे लक्षात घेत बैल बाजार सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

---------------------------------------------

एप्रिल-मे महिन्यात बैल जोड्यांच्या खरेदी-विक्रीला येतो वेग !

खरीप हंगामात साधारणत: जून, जुलै महिन्यात पेरणी केल्या जाते. त्यापूर्वी मशागतीची कामे पूर्ण करणे गरजेचे असते. त्या अनुषंगाने एप्रिल-मे महिन्यात बैल जोड्यांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरेदी-विक्री बंद असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. बाजार बंद असल्याचा फायदा घेत काही व्यापाऱ्यांनी बैलांचे दर वाढविल्याचे चित्र आहे. गतवर्षी ५० हजार रुपयात मिळणारी जोडी यंदा ६० ते ७० हजार रुपयांत मिळत असल्याचे चित्र आहे.

---------------------------------------------

गुरांच्या बाजारावर अवलंबून असणारे व्यावसायिक अडचणीत

बाजार बंद असल्याने बैल जोड्यांचे दर वाढले आहेत. तसेच चांगले व जातीवंत बैल मिळणे कठीण झाले आहे. खरीप हंगाम तोंडावर असल्याने बैलाच्या शोधात शेतकऱ्यांची धावपळ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त होत आहे. तसेच गुरांच्या बाजारावर अवलंबून असणारे व्यावसायिकही अडचणीत सापडले असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

-------------------------------------

मशागतीसाठी बैलजोडीची गरज आहे. ट्रॅक्टर मालकांनी मशागतीचे दर वाढविल्याने बैलांद्वारे मशागत परवडणारी आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन बैल बाजार सुरू करण्याची गरज आहे.

-धीरज सिरसाट, शेतकरी, सांगळूद.