शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पश्‍चिम विदर्भात गुन्हेगारीत बुलडाणा जिल्हा अव्वल

By admin | Updated: February 15, 2016 02:10 IST

अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यात तब्बल १0 हजार ३७५ गुन्हे.

बुलडाणा: दरवर्षी गुन्ह्याचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे चित्र पश्‍चिम विदर्भात पाहावयास मिळत आहे. वर्ष २0१५ मध्ये पश्‍चिम वर्‍हाडात अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यात तब्बल १0 हजार ३७५ गुन्हे घडले. यामध्ये बुलडाणा जिल्हा आघाडीवर असून, त्यापाठोपाठ अकोला व तिसरा क्रमांक वाशिम जिल्ह्याचा लागतो. अमरावती विभागात पाच जिल्ह्यात तब्बल २२ हजार ७0९ गुन्ह्यांच्या घटना घडल्या. यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, छेडछाड, बलात्कार, चोरी, लुटमार या गुन्ह्यांचा समावेश आहे.गुन्हेगारी रोखणे ही पोलिसांची जेवढी जबाबदारी आहे, तेवढेच कर्तव्य जनतेचेसुद्धा आहे. गुन्हेगारीमुळे सामाजिक वातावरण दूषित होऊन कायदा व सुव्यवस्था बाधित होते. गुन्हेगारी रोखण्यासाठी विविध सामजिक संघटना आपआपल्या पातळीवर प्रयत्न करीत असतात; मात्र तरीही गुन्ह्यांचा आलेख सतत वाढताच असल्याचे चित्र पश्‍चिम विदर्भात पाहावयास मिळत आहे. ज्या भागात रेल्वे सुविधा आहे अशा जिल्ह्यात व शहरामध्ये गुन्ह्याच्या घटना अधिक घडत असल्याचे दिसून आले आहे. बुलडाणा जिल्ह्यात शेगाव, मलकापूर, नांदुरा ही तीन शहरे वगळली तर रेल्वे लाइन कोठेही नाही; मात्र तरीही बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक गुन्ह्याच्या घटना घडल्याचे आकडेवारी वरून दिसते. तेरा तालुके असलेला व मराठवाडा ते खान्देश अशा विस्तीर्ण पसरलेल्या या जिल्ह्याची लोकसंख्या तब्बल २५ लाख ८८ हजार ३९0 एवढी आहे. बुलडाणा जिल्ह्यात वर्षभरात ४ हजार २१३ विविध गुन्हे घडले. बुलडाण्याच्या तुलनेत अकोला हे महापालिकेचे शहर असून, रेल्वे लाइनवर आहे तरीदेखील या जिल्ह्याचा क्राइम रेट कमी आहे. अकोला जिल्ह्यात केवळ सात तालुके असून, जिल्ह्याची लोकसंख्या १८ लाख १८ हजार ६१७ एवढी आहे; मात्र या जिल्ह्यात गुन्ह्यांची संख्या ३ हजार ७१२ एवढी आहे. तर वाशिम जिल्ह्याचा क्राइम रेट सर्वात कमी आहे. वाशिम जिल्ह्यात ५ तालुके व १0 लाख २0 हजार २१७ एवढी लोकसंख्या आहे. या जिल्ह्यात मागील वर्षी २ हजार ३७0 एवढे गुन्हे घडले आहेत.