शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्यातील चित्रकार संगीताची भरारी

By admin | Updated: December 5, 2014 00:07 IST

तैलचित्रांना मिळतेय साता समुद्रापार पसंती

हर्षनंदन वाघ/ बुलडाणारंगरेषांच्या प्रांतात रमणार्‍या बुलडाण्यातील एका कन्येने आंतरराष्ट्रीयस्तरावर भरारी घेतली आहे. तिने काढलेल्या तैलचित्रांना भरभरून पसंती मिळत आहे. या तैलचित्रांची प्रदर्शन आता मुंबईतील सुप्रसिद्ध जहाँगिर आर्ट गॅलरीमध्येही आयोजित करण्यात आले आहे.३ वर्षापूर्वी बंगलोर येथे सर्वप्रथम तिच्या तैलचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले. त्या वेळी अमेरिका, इंग्लंड, जपान येथील काही रसिकांनी तिची तैलचित्रे विकत घेतली. त्यातून तिला तब्बल चार लाखापर्यंत मानधन मिळाले होते. आता पुन्हा जहांगीर आर्ट गॅलरी येथे तिने साकारलेल्या भगवान गौतम बुद्ध यांच्या विविध तैलचित्रांचे प्रदर्शन १0 ते १६ डिसेंबर २0१४ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या वेळी देश, तसेच परदेशातील हौशी कलावंत भेट देणार आहेत.रंग विक्रीचा व्यवसाय करणारे बुलडाण्यातील श्रीकांत व अशाताई कोडोलकर यांची कन्या संगीता कोडोलकर हिला लहानपणापासून रंग, कुंचल्याचे आकर्षण होते. एडेड हायस्कुलची विद्यार्थीनी असलेल्या संगीताने कलेच्या क्षेत्रात करियर करण्यासाठी औरंगाबाद येथे शासकीय बीएफए महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिचे पती अभय राजनकर हे बंगलोर येथे जाहिरात व्यवसायाशी निगडीत असल्यामुळे, तसेच सासरे रत्नाकर आणि सासू सरला राजनकर यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे तिच्या कलेला प्रोत्साहन मिळाले. *चित्रपट दिग्दर्शक गुलजार भेट देणारजहांगीर आर्ट गॅलरी येथे आयोजित संगीता हिच्या दुसर्‍या तैलचित्र प्रदर्शनाला देशातील हौशी कलावंतासह प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक गुलजारही भेट देणार आहेत.